यशवंतनगर (युगारंभ )-महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग यशवंतनगर येथे चिमुकल्यांचा शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी गुलाबपुष्प, खाऊ आणि फुगे देऊन मुलांचे औक्षण करण्यात आले.. आणि ढोलच्या गजरात स्वागत करण्यात आले..
या कार्यक्रमाची सुरुवात महर्षि शंकरराव मोहिते पाटील व आक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रतिमा पूजन प्रशाला समिती सदस्य पांढरे साहेब, पाटील सर, मुख्याध्यापक पारसे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मुलांना यानिमित्त मोफत पाठयपुस्तक वाटप करण्यात आली व स्वागत करण्यात आले.
नवीन इमारत, नवा परिसर, नवे शिक्षक,नवीन मित्र या वातावरणात आलेली ही बालचमू मंडळी आई बाबांचे बोट सोडून केव्हा शाळेत रममान झाली हे पालकांसह मुलांना पण कळाले नाही..शाळेत येण्याचा पहिला दिवस याचा आनंद प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर ओंसाडून वाहत होता.
प्रशालेच्या सभापती मा. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशालेचे मुख्याध्यापक पारसे सर, सर्व शिक्षकवृंद व पालक यांच्या सहकार्याने या प्रवेशोत्सव महोत्सवी करण्यात आला.