अकलूज (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज प्रशालेत आज मंगळवार दि.२१/०६/२०२२ रोजी ” जागतिक योग दिन” साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या सुरवातीस स.म.शंकरराव मोहीते पाटील उर्फ काकासाहेब,स्व.रत्नप्रभादेवी मोहिते पाटील उर्फ आक्कासाहेब आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम,योग शिक्षक श्री.निंबाळकर सर,श्री.दुधाट सर यांच्या शुभहस्ते झाले.
प्रशालेतील योग शिक्षक श्री.निंबाळकर सर,श्री.दुधाट सर यांनी योग-प्राणायाम यांचे जीवनातील महत्व,उपयोग आणि शास्त्रशुद्ध पद्धती यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
प्रत्यक्षपणे प्रात्यक्षिक करताना सूर्यनमस्कार, उष्ट्रासन,वज्रासन,सुप्तवज्रासन,कोनासन, त्रिकोनासन,मक्रासन,हलासान, धनुरासन,शीर्षासन,शवासन ही योगासने त्याचबरोबर प्राणायाम मध्ये अनुलोम - विलोम, कपालभाती,भ्रामरी इ. प्रकार घेण्यात आले.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम,सर्व शिक्षक – शिक्षिका,पूर्वप्राथमिक विभागाच्या सर्व महिला शिक्षिका,इयत्ता ३ री व ४ थी चे विद्यार्थी यांनी योगा-प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रभाकर चव्हाण सर यांनी केले.