माळीनगर (युगारंभ )-मौजे गणेशगाव ता. माळशिरस येथील सरपंच पदाची निवड प्रक्रिया दि २२ जून रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली नुतन सरपंचपदी उषा रामचंद्र ठोंबरे यांची निवड झाली . सुरूवातीला सरपंच निवडीचा प्रस्ताव गटनेते दादासाहेब नलवडे यांनी मांडला याला सर्वानुमते मंजूरी मिळाल्यानंतर निवड प्रक्रिया करण्यात आली.
यावेळी मावळत्या सरपंच शोभा विठ्ठल नलवडे यांनी सदस्य व ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले याप्रसंगी उपसरपंच बाळासाहेब ठोकळे , सदस्य पोपट रूपनवर , सदाशिव शेंडगे ,रेहाना शेख , तंटामुक्त अध्यक्ष गणपत वाघ, पोलिस पाटील भाईसाब शेख, सिताराम शेंडगे , रामचंद्र ठोंबरे , नजीर शेख , दिलीप ठोंबरे, महादेव नलवडे ,अहमद पठाण, बाळासाहेब रूपनवर , सदाशिव शेंडगे , तुकाराम नलवडे , गणेश ठोंबरे, शिवाजी ठोंबरे आदी व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अध्यासी अधिकारी म्हणून संजय फिरमे , तलाठी एस.एम.क्षीरसागर , ग्रामसेवक एस.एस.जाधव यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुंडलिक शेंडगे यांनी मानले . तसेच माजी सरपंच तुकाराम सोलनकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.