श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील पुण्यतिथीनिमित्त माता पालकांचा सन्मान
अकलूज(युगारंभ )-श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय संग्रामनगर शाळेत श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील पुण्यतिथी निमित्त प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या मातांचा रत्नाई पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशाला समिती सदस्य महादेव अंधारे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशाला समिती सदस्य यशवंत साळुंखे उपस्थित होते.
यावेळी बालवाडी, पहिली ते चौथी , पाचवी ते दहावी या वर्गातील गुणवंत विद्यार्थी व माता यांना स्मृतीचिन्ह गुलाबपुष्प प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक रशीद मुलाणी यांनी केले. तसेच इयत्ता चौथीतील विद्यार्थीनी निशिगंधा गणेश तोरसकर हिने आक्कासाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला.
प्राथमिक विभाग मुख्याध्यापक गणेश करडे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात अंधारे यांनी
“शाळेतील विविध उपक्रमातील यशाचा आढावा घेऊन आदरणीय बाळदादा यांच्या प्रेरणेतून शाळा पुढील वाटचाल चांगली करेल अशा शुभकामना दिल्या.”
बक्षीस वितरण वाचन सहशिक्षक रमाकांत साठे यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार विलास कस्तुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कष्ट घेतले.