यशवंतनगर (युगारंभ )-श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या 95 व्या जयंतीचे औचित्य साधून ‘महर्षि संकुल’ यशवंतनगर ता. माळशिरस येथे इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगरचे डॉ. श्री इंद्रजीत विलासराव यादव उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष महर्षी प्रशालेचे सभापती जेष्ठ विधीज्ञ नितीनराव खराडे साहेब हे होते, प्रमुख व्याख्यात्या सुनिता सुभाष ठोंबरे मॅडम या होत्या.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित चित्रकला स्पर्धांचे उद्धघाटन करण्यात आले.
संकुलातील विद्यार्थिनी सिद्धी वाघ हिने अक्कासाहेबांच्या जीवनावरती आपले विचार व्यक्त केले.
प्रमुख व्याख्याते यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये येणाऱ्या समस्या आणि त्यांचे निराकरण कसे करायचे आणि अक्कासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये महिलांसाठी आणि सर्व समाजासाठी कशा पद्धतीने कार्य केले यावर आपले विचार व्यक्त केले.
डॉक्टर इंद्रजीत यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थी सर्वगुण संपन्न बनला पाहिजे विद्यार्थ्यांनी कला व क्रीडा या विभागामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचा परिसराचा नावलौकिक वाढवला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष खराडे साहेबांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेविषयी त्याचबरोबर शारीरिक सक्षमते विषयी मार्गदर्शन केले.
या शुभप्रसंगी विषयात शंभर पैकी शंभर गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व आपल्या विषयाचा शंभर टक्के निकाल लावलेल्या शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष खराडे साहेब यांनी गरीब विद्यार्थी निधीसाठी पाच हजार रुपये रोख रक्कम माननीय मुख्याध्यापक फुले सर यांच्याकडे सुपूर्द केली.
सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक फुले सर, कुंभार सर, पारसे सर उपस्थित होते, तसेच प्रशाला कमिटी सदस्य श्री चौधरी साहेब,नितीन इंगोले देशमुख,विनोद जाधव, अनिल जाधव गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या देणगीदारांचाही सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर महर्षी वाद्य वृंदातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाचे आभार पारसे सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या गीताने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री नामदेव कुंभार सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांनी मानले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाझिया मुल्ला यांनी केले