लवंग (युगारंभ )-महाराष्ट्र राज्य मान्य प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ या देशव्यापी संघटनेत महादेव बापू राजगुरू यांची माळशिरस तालुका अध्यक्षपदी व सचिव पदी रमेश कृष्णा भोसले निवड करण्यात आली.
तसेच या संघटनेच्या कार्याध्यक्षपदी शंकर यादव यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ हा प्राथमिक शिक्षकांच्या समस्या व मागण्या या संदर्भात पाठपुरावा करणारी महाराष्ट्रातील एकमेव संघटना आहे.
महाराष्ट्रातील खाजगी शिक्षकांचे प्रश्न सोडवणारी, वेतन पथक मिळवून देणारी, शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सतत कार्यरत असणारी,अनेक प्रलंबित, न्यायप्रविष्ठ प्रश्न ही संघटना सर्व पातळीवर कार्यरत असते.
या महासंघावर निवड झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.