लवंग (युगारंभ )-वाघोली ता माळशिरस या ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूकचे दि ४रोजी मतदान झाले आज दि ५रोजी मतमोजणी होऊन त्यात सत्ताधारी बहुजन विकास गटाचे ३उमेदवार व खंडोबा ग्रामविकास परिवर्तन गटाचे ८ उमेदवार विजयी झाले .
बहुजन विकास गटाचे नेतृत्व जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ,पंचायत समितीचे माजी सदस्य सूर्यकांत शेंडगे,साखर कारखान्याचे संचालक सतीश शेंडगे हे मात्तबर करीत होते .श्री खंडोबा ग्रामविकास परिवरवर्तन विकास आघाडीच्या गटाचे योगेश माने,बळीराम मिसाळ,पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने,तंटा मुक्ती कमिटीचे माजी अध्यक्ष सुरेश पवार,मारुती चांगदेव मिसाळ,माजी डेप्युटी सरपंच कालिदास मिसाळ ,हरिदास चव्हाण,अमोल विलास मिसाळ,संजय मिसाळ,
रघुनाथ मिसाळ,आदी युवक करीत होते. दि ५ऑगस्ट रोजी माळशिरस तहसील कार्यालयात सकाळी मतमोजणी झाली त्यात सत्ताधारी बहुजन विकास आघाडीतील प्रभाग क्रमांक २ मधील तीनच उमेदवार विजयी झाले .उर्वरित प्रभाग क्रमांक १,३,४,मध्ये श्री खंडोबा विकास परिवर्तन आघाडीचे एकूण८ उमेदवार दणदणीत मते मिळऊन वाघोली ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली
प्रभाग निहाय मतदान व मिळालेली मते पुढील प्रमाणे प्रभाग क्र १ मध्ये एकूण ५७९ मतदान झाले त्यात श्री खं डोबा विकास परिवर्तन विकास आघाडीचे विजयी उमेदवार लक्षीमन पारसे ३०० ,सौ पाटोळे छाया भारत २९९, सौ वृषाली माने ३३९प्रभाग क्र २ मध्ये एकूण झालेले मतदान ८०८ बहुजन विकास आघाडीचे विजयी उमेदवार सूर्यकांत मिसाळ ४४८,कल्याणी कांबळे४८१,स्मिता मिसाळ४३३,प्रभाग क्र ३मध्ये एकूण ६५८ मतदान झाले.त्यात श्री खंडोबा परिवर्तन विकास आघाडीचे विजयी उमेदवार पंडित विठ्ठल मिसाळ३५८,सौ सुजाता बळीराम मिसाळ ३८१ मते मिळऊन विजयी झाले .प्रभाग क्रमांक ४मध्ये एकूण ६०२ मतदान झाले असून त्यात श्री खंडोबा परिवर्तन विकास आघाडीचे अविनाश गाडे ३२५,योगेश माने ३२४ सौ रोहिणी अमोल मिसाळ३३१मते मिळवून विजयी झाले.गेली ३५वर्षे ग्रामपंचायतीवर प स माजी सदस्य सूर्यकांत शेंडगे यांच्या गटाची सत्ता होती .तसेच माणिकराव मिसाळ यांची ही काही वर्षे सत्ता होती.
आजच्या निकालामुळे ती सत्ता परिवर्तन होऊन श्री खंडोबा परिवर्तन विकास आघाडीकडे गेली असून विजयी उमेदवारांचे मा आ रणजितसिंह मोहिते पाटील,सह महर्षी कारखान्याचे चेअरमन मा जयसिंह मोहिते पाटील,कृषी उत्पन्न समितीचे अध्यक्ष मा मदनसिंह मोहिते पाटील,भा ज प चे सोलापूर जिल्हा संघटक मा धैर्यशीलसिंह मोहिते पाटील ,अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटीलयांनी अभिनंदन करून सत्कार केला.