लवंग (युगारंभ )-भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त13 ते 15 ऑगस्ट घरोघरी तिरंगा या मोहिमे अंतर्गत अकलूज येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी माळशिरस तालुक्यातील नागरिकांच्या सहभागाबद्दल निमंत्रण देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांनी बाभुळगाव ता. माळशिरस येथे भेट दिली व ग्रामस्थांशी संवाद साधला.
याप्रसंगी माळशिरस तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब तात्या पराडे पाटील, शंकरराव पराडे पाटील, तानाजीबापू पराडे पाटील,पंडित पराडे पाटील,विनायक पराडे पाटील, अजित पराडे पाटील,प्रकाश पराडे पाटील,संभाजी पराडे पाटील तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रस्ताविक व सूत्रसंचालन प्रा अनिल पराडे पाटील यांनी केले तर मा.बाळासाहेब पराडे पाटील संचालक शिवामृत दूध संघ अकलूज यांनी आभार मानले.