लवंग (युगारंभ ): दिवसा थ्री फेज लाईट मिळावी ही मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केली होती .जर दिवसा शेतकऱ्यांना थ्री फेज लाईट न दिल्यास युवा सेना ८ऑगस्ट २०२२रोजी सकाळी दहा वाजता MSEB अकलूज समोर नग्न आंदोलन करणार होती . अशा आशयाचे पत्र गणेश इंगळे यांनी अकलूज MSEB ला दिले होते .
या पत्राच्या अनुषंगाने अकलूज चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता कोकरे साहेब यांनी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सोनू पराडे पाटील यांना चर्चेला बोलावून चर्चा केली .
सद्या शेतकऱ्यांचा ऊस लागवडीचा हंगाम चालू आहे रात्र पाळी ७ दिवस असल्या कारणाने ऊस लागवड करण्यास शेतकऱ्यांना त्रास होत होता . ऊस उगवण्याचे प्रमाण कमी होते . ह्या सर्व गोष्टी गणेश इंगळे व सोनू पराडे यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता कोकरे साहेब यांच्या लक्षात आणून दिले .
कोकरे साहेब यांनी दिवस पाळी ७ दिवस होती आणि रात्र पाळी ७ दिवस होती त्यात बदल करून दिवस पाळी ३ दिवस आणि रात्र पाळी ३ दिवस बुधवार चा दिवस सोडून असा मार्ग काढून युवा सेनेच्या पदाधिकारी यांना आश्वासन दिले .आता पासून हा आदेश लागू करू अशा आशयाचे पत्र युवा सेनेच्या कार्यकर्त्याना दिले व शेतकऱ्यांना जेवढे शक्य होईल तेवढे सहकार्य करू असे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता कोकरे साहेब यांनी दिले .
यावेळी शिवसेनेचे शाखा प्रमुख विकी पराडे संतोष पराडे प्रशांत पराडे शंकर पराडे गणेश पराडे रज्जाक मुलाणी ई युवा सैनिक उपस्थित होते.