लवंग (युगारंभ ): युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख विक्रम उर्फ सोनू भैय्या पराडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाभुळगावचे सरपंच भूषण भैय्या पराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
हे वृक्षारोपण बाभुळगाव येथे असलेल्या भव्य क्रिडा मैदानाच्या भोवती वृक्षारोपण करण्यात आले, आजच्या काळात कमी होत असलेली पशूपक्षांची संख्या तसेच निरोगी जिवनासाठी आवश्यक असलेल्या शुद्ध हवेचे महत्व व सावलीचे महत्व लक्षात घेता, हे वृक्षारोपण करण्यात आले.
RFO शिशुपाल पवार यांच्या वतीने यांच्या उपस्थितीत वड,पिंपळ,चिंच,करंज,पिंपरन,शिसम,पाम या झाडांचे वृक्ष लावण्यात आले,.
यावेळी RFO चे शिशुपाल पवार तसेच क्रिडा समिती मार्गदर्शक सोमनाथ पराडे, शिवसेना शाखाप्रमुख विकी पराडे ,क्रिडा विभाग सदस्य नाना पवार ,बबलू पाटील, संजय पराडे ,राम पवार ,अभिजीत पराडे,अविनाश पराडे,अक्षय पराडे,मनोज पराडे ई कार्यकर्ते उपस्थित होते.