अकलूज (युगारंभ )-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज प्रशालेत दिनांक 9 रोजी क्रांतीदिन उत्साहात साजरा करण्यात आला . 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी बाळासाहेब क्षिरसागर आणि विजय पाटील तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख ह्या उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश करडे सर यांनी केले
याप्रसंगी इयत्ता दुसरी विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक यांच्या वेषभूषेत येवून घोषणा दिल्या. इयत्ता दुसरीतील विद्यार्थींनी मनस्वी शिनगारे आणि आरोही मोगरंगे यांनी क्रांती दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले.
शिक्षक भाषण प्रशांत पवार सर यांनी केले सुत्रसंचलन नामदेव पाटील सर व सोमनाथ बाजारे सर यांनी आभार मानले.