अकलूज (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,’महर्षि संकुल’, यशवंतनगर या ठिकाणी आज दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिन निमित्त स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी माजी सैनिक संभाजी पवार व माजी सैनिक बाळासाहेब पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीनराव खराडे-पाटील हे होते.
प्राथमिक विभागातील बालचमूनी क्रांतीकारकाच्या वेशभूषा साकारल्या – यामध्ये राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका सई लोखंडे, ज्ञानेश्वरी कोठगार, लो. टिळक यांची भूमिका सान्वी गायकवाड नेताजी सुभाषचंद्र बोस – अनन्या बनकर, जिजामाता यांची भूमिका मरेक मुलाणी, सिद्धी वाघ, भगतसिंग, सुखदेव राजगुरू यांची भूमिका अर्जुन लोखंडे’, उत्कर्ष चव्हाण, शंभूराजे चव्हाण महात्मा गांधी यांची भूमिका सोहम कपूर, सोहम गोसावी. पंडित नेहरू यांची भूमिका शर्वरी रेडेकर सावरकर यांची भूमिका वेदान सकट सावित्रीबाई फुले यांची भूमिका समृद्धी रणवरे, अमृता रोवते व सैनिकाच्या वेशभूषेत ओम गायकवाड या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी केले.विद्यार्थ्यीनी समृद्धी बाबर व श्रावणी मोहिते यांनी क्रांतीदिनाविषयी आपले विचार व्यक्त केले. शिक्षक ईलाही बागवान यांनी आपल्या भाषणातून क्रांती दिनाचे माळशिरस तालुक्याच्या दृष्टीने महत्व सांगितले तर प्रमुख मान्यवर संभाजी पवार यांनी कारगील युद्धातील आपल्या आठवणी व युवाशक्तीची जाणीव यावर आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत विदयार्थ्यांची तिरंगा जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. हर घर तिरंगा या उपक्रम जनजागृतीसाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
महर्षि पूर्व प्राथमिक विभागातील बालचमुंसाठी यशवंतनगरचे माजी सरपंच मा. सत्यशीलभैय्या मोहिते -पाटील यांनी संपूर्ण गाडीभरून मुलांना खेळणी दिली व या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित केला.
यानिमित्त कार्यक्रमास मुख्याध्यापक संजय गळीतकर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक शिवाजी पारसे, लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघ उपस्थित होते. तसेच प्रशाला समिती सदस्य विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख, व अनिल जाधव सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन नाझिया मुल्ला यांनी केले तर आभार अंकुश एकतपुरे यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता सारे जहाँसे अच्छा समूहगीताने झाली