December 1, 2023
yugarambh
Breaking News
Otherजिल्हा

मनात तिरंगा, ध्‍यानात तिरंगा प्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा, आपल्या सर्वांचा धर्मच तिरंगा..!-अकलूजमध्ये महोत्सवी अमृतमहोत्सव

अकलूज (युगारंभ )-भारतीय स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष मा.जयसिंहजी मोहिते-पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनपर मा.धैर्यशिल मोहिते-पाटील साहेब ,मा.संग्रामसिंह मोहिते-पाटील साहेब, मा.अर्जुनसिंह मोहिते-पाटील साहेब, मा.कु.स्वरूपाराणी दिदीसाहेब मोहिते-पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार महर्षी कारखाना गेस्ट हाऊस येथे पत्रकार परीषद संपन्न झाली.

 

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त अकलूज येथे ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

*दि.९ ऑगस्ट* रोजी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, या रॅलीत शंकरराव मोहित महाविद्यालय ,महाविद्यालयाचे गाळेधारक,औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय,शंकरराव मोहिते-पाटील इंजीनियरिंग काॅलेज व शिवरत्न नाॅलेज सिटी मधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ही रॅली शंकरराव मोहिते महाविद्यालया पासून सुरू होऊन प्रतापसिंह चौक ,आंबेडकर चौक,जुने बसस्थानक, गांधी चौक,सदुभाऊ चौक,महर्षी चौक प्रतापसिंह चौक मार्गे पुन्हा शंकरराव मोहिते महाविद्यालय येथे समाप्त होणार आहे.*

बुधवारी(दि. १०)* माळशिरस तालुक्यातील १२०० नागरिकांची दुपारी तीन वाजता तिरंगा मोटारसायकल रॅली निघणार आहे. यात महिलाही सहभागी होतील. यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे ६७२, शिवरत्न शिक्षण संस्थेचे १९२, अकलूज सोसायटीचे ७. खरेदी विक्री संघाचे ५ कृषी उत्पन्न बाजार समितीचे २१ असे बाराशे महिला पुरुष सहभागी असतील. ही रॅली प्रतापसिंह चौक, आझाद चौक, गांधी चौक, संग्रामनगर, माळशिरस, खुडूस,विजयवाडीमार्गे अकलूज येथील विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात तिरंग्याला अभिवादन करून समारोप होईल.

 

याच दिवशी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागात सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना, शिवामृत दूध उत्पादक संघ, विजयसिंह मोहिते पाटील वाहतूक संघ, यशवंत नगर सोसायटी व शंकरनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालय यांचे विद्यार्थी व पदाधिकारी यांची मोटारसायकल रॅली निघणार आहे. ही मोटर सायकल रॅली शंकरनगर येथून निघून सदुभाऊ चौक, माळीनगर, सेक्शन २५-४ महाळुंग, श्रीपूर,बोरगाव माळखांबी, बोंडले, वेळापूर, खंडाळी, माळेवाडीमार्गे ८६ किलोमीटर लांबीचा प्रवास करून परतेल. 

 

रविवारी(दि. १४)* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी रात्री नऊ वाजता हा सोळा सुरू होईल . या सोहळ्यांमध्ये १२ भव्य चित्ररथांसह, संचलन घोष पथक, अश्वपथक सहभागी होणार असून या रॅलीत २५ हजार कलाकारांचे सादरीकरण होणार आहे .ही रॅली अकलूज येथील सदुभाऊ चौकापासून सुरू होऊन गांधी चौक, जुने बसस्थानक, सदुभाऊ चौकमार्गे विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे येणार आहे. रात्री ११ वाजता ही रॅली क्रीडा संकुलावर आल्यानंतर येथे देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 

या सोहळ्यामध्ये शहीद जवान, स्वातंत्र्य सैनिक, वीर जवान यांच्या परिवारांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. या ठिकाणी भव्य असा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव सोहळा समिती अकलूजच्या वतीने करण्यात आले.

रविवार दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ. ९ वा.

स्थळ : सदुभाऊ चौक, अकलूज

 

I आयोजक I

भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव समिती, अकलूज

 

Related posts

अकलूज शहर बुरूड समाज व युवा मंच,अकलूज यांच्याकडून तिरंगा रॅलीचे आयोजन

yugarambh

‘समावि’ मध्ये स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित दिनांक-१३ ऑगस्ट २०२२ रोजी ध्वजारोहण संपन्न.

yugarambh

सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग,अकलूजमध्ये नवीन विदयार्थ्यांचे स्वागत..

yugarambh

किर्तीध्वजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, समाजपयोगी उपक्रम..!

yugarambh

यशवंतनगर प्राथमिक शाळेत प्रवेशोत्सव संपन्न

yugarambh

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त गणेश नगर अकलूज येथे पाणीपुरी फ्री 

yugarambh

Leave a Comment