अकलूज (युगारंभ )-अकलूज शहर बुरूड समाज व युवा मंच,अकलूज यांच्यावतीने भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव सोहळा 2022 निमित्त अकलूज शहरांमध्ये अकलूज शहर बुरुड समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 4 वाजता तिरंगा मोटर सायकल रॅली काढण्यात आली या रॅलीचा उद्घाघाटन सोहळा मा.श्री. जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील साहेब यांच्या शुभहस्ते झेंडा दाखवून झाला.
संपूर्ण देशभरात अमृतमहोत्सवानिमित्त तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. याच कारणाने प्रेरित होऊन अकलूजमधील बुरुड समाज एकत्र येऊन त्यांनी या रॅलीचे आयोजन केले.सर्व समाज बांधव आनंदाने, उत्साहाने गांधी चौक येथे आपली मोटरसायकल घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
भारत माता की जय, वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद, जय जवान जय किसान घोषणांनी अकलूज परिसर दुमदुमून गेला. बुरुड समाजातील जेष्ठव्यक्ती, तरुण मित्र,बालचमू या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यामुळे सर्व परिसर तिरंगामय झाला होता.
रॅलीचा मार्ग
श्री.राजेंद्र सुर्यवंशी यांचे गांधी चौकातील घरापासून सुरुवात विजय चौक, जोशी गल्ली, शिवसृष्टी किल्ला, खाटीक गल्ली, काझी गल्ली, गुरुनगर, रामायण चौक, हनुमान मंदिर, आझाद चौक, भाजी मंडई, जुने पोलिस स्टेशन गांधी चौक, इंदापूर रोड राऊत नगर जुना सराटी रोड, विकास नगर, विजय चौक,जुने एस् टी स्टँड मार्गे सदुभाऊ चौक, प्रतापसिंह चौक,नवीन पोलीस स्टेशन, महर्षि चौक,सदुभाऊ चौक,महावीर पथ, गांधी चौक येथे समाप्ती झाली.