लवंग (युगारंभ )- दि मॉडेल विविधांगी प्रशाला माळीनगर मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमात अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराव शिवपुजे उपस्थित होते.
बालपण देगा देवा,जसा मुंगी साखरेचा रवा!
बालपण हे त्याच वयात घ्यावं, त्याची किंमत मोठेपणी कळते तसेच खेळाबरोबर अभ्यास करावा,आपण काय बनावं? हे इतरांचे ऐकण्यापेक्षा आपल्याला काय बनायचे ते आपण आनंदाने करावं व त्यामध्ये प्राविण्य मिळवावे असे त्यांनी सांगितले.
तसेच हर घर तिरंगा ही मोहीम विद्यार्थ्याने आपल्या घरी सांगावी व ध्वजाचा मानसन्मान करावा असे त्यांनी सांगितले
कार्यक्रमास एज्युकेशन सोसायटीचे सचिव सचिन बधे,दि सासवड माळी शुगर फॅक्टरी चे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र गिरमे,पीएसआय कांबळे,पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी,पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक पवार,तसेच प्राचार्य गिरीश ढोक, उपप्राचार्य प्रकाश चवरे उपस्थित होते.
मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन प्रशाले तर्फे सत्कार करण्यात आला. सोनाली जाधव विद्यार्थिनीने देशभक्तीपर गीत गीत गायले.तिला मान्यवरांचे हस्ते रोख पारितोषिक देण्यात आले