अकलूज (युगारंभ )—–जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा स्वामी साहेब व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जाधव साहेब यांचे संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात आरोग्य विभागात जन संजीवनी अभियान राबविण्यात आले होते.
सोलापूर जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांनी या अभियानात सहभाग नोंदवला होता.या अभियानात प्राथमिक आरोग्य केंद्रांनी इमारतीची रंगरंगोटी करणे,प्राथमिक आरोग्य केंद्रात योग शिबीर घेणे,परिसर स्वच्छता,लोक सहभागातून परिसरात वृक्षारोपण करणे,भिंतीवर सुविचार लिहून भिंती बोलक्या करणे,रुग्णासाठी योग्य सुविधा पुरवणे,आदी योजना राबविणे गरजेचे होते .
त्यानुसार प्रत्येक आरोग्य केंद्राची तपासणी केली असता त्यात सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील शंकर नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा पहिला क्रमांक आला तर माळशिरस तालुक्यात माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम क्रमांक आला.
दि ११ रोजी जिल्हा परिषद सोलापूर येथे झालेल्या सन्मान सोहळ्यात शंकर नगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते तसेच माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संकल्प जाधव व प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी यांचा प्रशिस्तीपत्रक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा स्वामी साहेब व जिल्हा आरोग्य अधिकारी मा डॉ जाधव साहेब यांचे हस्ते सन्मान करण्यात आला .
सदर यशाबद्धल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मा गुळवे साहेब यांनी आरोग्य विभागातील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते व शंकर नगर व माळीनगर प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले