माळीनगर -(युगारंभ )-दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबवे या ठिकाणी ‘हिन्दुस्तान फिड्स अर्थात बारामती कॅटल फिड्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले. अतिशय दर्जेदार अशा ८५८ वह्या कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. याप्रसंगी कंपनीचे विस्तार अधिकारी डॉ. रसाळ साहेब , एरिया इन्चार्ज श्री. हरीश पिसाळ सर, सेल्स ऑफिसर श्री. विष्णू मिसाळ सर यांनी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.
आदरणीय डॉ. रसाळ साहेब यांनी कंपनीची वाटचाल,कंपनीचा इतिहास आणि कंपनी जपत असलेली सामाजिक बांधिलकी याबाबत सविस्तर मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनादेखील शैक्षणिक विकास कसा साधावा या बाबत मार्गदर्शन केले. शाळेतर्फे आलेल्या मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री भिंगे सर, शिक्षक वृंद तसेच शिवदत्त बचत गट यांच्या सदस्या उपस्थित होत्या.बारामती कॅटल फिड्स कंपनीतर्फे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासामध्ये सुमारे ३६ हजार रुपयांच्या८५८ वह्या देऊन मोलाचे सहकार्य आमच्या शाळेला लाभले, त्याबद्दल कंपनी व आलेले सर्व अधिकारी यांचे उप शिक्षक श्री उमाजी माने यांनी आभार मानले
सदरचे उपक्रमाबद्धल विध्यार्थी यांनी समाधान व्यक्त करून कंपनीचे आभार मानले