लवंग (युगारंभ )-श्री. जयसिंह मोहिते- पाटील विद्यालय व प्राथमिक शाळा संग्रामनगर मध्ये आज अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रशालेच्या सभापती मा. सौ. निशा गिरमे मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले व ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती प्रशाला समिती सदस्य मा. श्री महादेवराव अंधारे साहेब यांची होती.
प्रशालेमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते देशभक्तीपर गीते तसेच सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांची भाषणे असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री. बी .टी शिंदे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना व पालकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशाला समिती सदस्य मा. श्री. महादेवराव अंधारे साहेब यांनी आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थी, शिक्षक सर्व पालक संग्रामनगर मधील नागरिंकाना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज तर्फे सादर करण्यात आलेला भारतीय अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा 2022 मध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक सर्व पालक यांचे अभिनंदन केले.
अंधारे साहेब यांनी भारतीय अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन सोहळा समितीचे अध्यक्ष मा. श्री .जयसिंह शंकरराव मोहिते -पाटील तथा बाळदादासाहेब व कार्याध्यक्ष मा. श्री. धैर्यशील राजसिंह मोहिते- पाटील तथा भैय्यासाहेब व कार्याध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह जयसिंह मोहिते- पाटील तथा आण्णासाहेब यांचे अभिनंदन केले कारण हा भव्यदिव्य सोहळा सर्व नागरिकांना पाहण्याचा व त्या भव्यदिव्य सोहळ्याचे साक्षीदार बनण्याची संधी आपल्याला मिळाल्याबद्दल त्यांनी आपल्या भाषणातून अभिनंदन केले.
आजच्या कार्यक्रमासाठी संग्राम नगर परिसरातील बहुसंख्य पुरुष पालक व माता पालक उपस्थित होते सर्व पालकांनी कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.