लवंग (युगारंभ ):-अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त वंदे मातरम गणेशउत्सव मंडळ गणेश नगर, अकलूज यांच्या वतीने लहान मुलासाठी चॉकलेट व इतर खाऊ व गणेश नगर मधील सर्व नागरीकासाठी पाणीपुरी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत विना मूल्य ठेवण्यात आली होती.
जयसिंहजी मोहिते, आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील, पाटील ,धैर्यशीलजी मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील, शिवतेजसिंहजी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पाणीपुरी खाण्याचा आनंद दिवस भरा मध्ये 300ते 400नागरिकांनी घेतला या मध्ये महिला पुरुष जेष्ठ व्यक्तीं मुले मुली यांचा समावेश होता.तसेच एव्हरेस्ट वीर निहाल बागवान यांच्या आई वडिलांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या साठी वंदेमातरम् गणेशउत्सव मंडळातील ॲड बाळासाहेब भिलारे वकील साहेब,इंजिनिअर विठ्ठल खंदारे साहेब ,नाशिक आबा सोनवणे ,श्रीराज भैय्या देशमुख ,राहुल (बंटी )जगताप महादेव पाटील, बळीराम चव्हाण (सर ), कॉन्ट्रॅक्टर विजय भोसले रमेश अण्णा नायर ,किरण जावळे यांचे सहकार्य लाभले गणेश अनपट , निलेश ठोंबरे, संग्राम भिलारे ,अभिषेक भिलारे , अतुल सोनवणे, अमोल प्रक्षाळे, बंटी सोनवणे, महेश वाघ , सुरज पवार ,सौरव मुळे, सुरज मुळे, विजय कांबळे, अजय सोनवणे , शैलेश दिवटे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिक परीश्रम घेतले.