अकलूज (युगारंभ )-दि१५ ऑगस्ट रोजी सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग,अकलूज प्रशालेत भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एव्हरेस्टवीर निहाल बागवान यांचे वडील अश्पाक रज्जाक बागवान उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरमाता वहिदा अश्पाक बागवान होत्या तर जावळे वहिनी अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तिरंगा ध्वजाला मानवंदना देऊन झाल्यानंतर प्रशालेतील आनंदयात्री बालवाद्यवृंदातील विद्यार्थी कलाकारांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत गायन केले.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बॅन्ड पथकाच्या तालात शिस्तबद्ध संचलन सादरीकरण केले. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी आकर्षक पणे कवायतीचे प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख यांनी केले. प्रशालेतील शिक्षक गणेश करडे यांनी अनुमोदन दिले.
प्रशालेतील विद्यार्थी चि.राजवर्धन संजय जाधव इयत्ता ३ री, कु.सिनिन शाकीर शेख इयत्ता २ री व कु.सोनल संदीप जाधव इयत्ता ४ थी या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या देशाबद्दल प्रेम,अभिमान वीर जवान यांचे बलिदान वीर जवानांचा आपल्या देशासासाठीचा त्याग यावर मनोगत व्यक्त केले
त्यानंतर निरोगी शरीरात निरोगी मन वास करते.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मानवी मनोऱ्याचे (पिरॅमिड चे) सादरीकरण केले.निरोगी शरीरासाठी व्यायामाची गरज आहे हा संदेश त्यांनी यातुन दिला.त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थी कलाकारांनी आपला नृत्याविष्कार सादर करुन सर्वांची मने जिंकली
सूत्रसंचालन श्री.गिरीश सुर्यवंशी सर यांनी केले संविधान वाचन युवराज बनपट्टे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सारे जहाँ से अच्छा या समुहगीताने झाली.