माळीनगर (युगारंभ )-माळीनगर एकवीस चारी येथील रहिवाशी ईश्वर रामचंद्र करडे यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले आहे.
ते सेवानिवृत्त आरोग्य सेवक होते त्यांनी शंकरनगर, गोपाळपूर, माळीनगर आरोग्य केंद्रावर बावीस वर्षे सेवा केली. जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांचा सन्मान झाला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
खुडूस येथील पत्रकार सचिन करडे यांचे ते वडील होते.