December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसर

गृहविज्ञान महिला महाविद्यालय ‘स्पोकन इंग्लिश’ विषयावर कार्यशाळा संपन्न

माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी दिनांक 20.08.2022 रोजी ”करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेल’ विभागाच्या वतीने ‘स्पोकन इंग्लिश’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

  यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. डी. वाय. पाटील अकॅडमीचे स्पोकन इंग्लिश विभागाचे प्रमुख श्री. महेश लोहार व राज खतीब हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे होते.

   यावेळी विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना श्री. महेश लोहार म्हणाले की, ” इंग्रजी भाषा ही ज्ञानाची भाषा आहे. इंग्रजी भाषा सर्वांना लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. इंग्रजी भाषेवर तुमचे प्रभुत्व असेल तर तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. त्यामुळे इंग्रजी भाषेकडे दुर्लक्ष न करता ती आत्मसात करा ‘ असे बहुमोल मार्गदर्शन केले.

     कार्यशाळेचे प्रास्ताविक करिअर गायडन्स व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. अमित घाडगे यांनी केले. सुत्रसंचलन कु. प्रणाली फडतरे व आभारप्रदर्शन कु. आरती पवार यांनी केले.

     याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ. ऋषी गजभिये, डॉ. राजश्री निंभोरकर, डॉ. छाया भिसे, प्रा. के. के. कोरे व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related posts

पंतप्रधान मोदी यांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात महाराष्ट्रात संताप; सोशल मीडियावर पडसाद

Admin

मनात तिरंगा, ध्‍यानात तिरंगा प्रत्येकाच्या घरोघरी तिरंगा, आपल्या सर्वांचा धर्मच तिरंगा..!-अकलूजमध्ये महोत्सवी अमृतमहोत्सव

yugarambh

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माळीनगर येथे आजी माजी सैनिकांचा सन्मान

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेच्या १६०० मुलींचा पारंपरिक भोंडला खेळात सहभाग

yugarambh

भविष्यात सर्व सोयीयुक्त वृद्धाश्रम उभारणार ; जुल्कर शेख 

yugarambh

श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय संग्रामनगर येथे ‘रत्नाई’ पुरस्काराचे वितरण

yugarambh

Leave a Comment