माळीनगर (युगारंभ )-युवाशक्तीचा योग्य तो विकास करून त्यांना समाज विधायक कार्याची दिशा देऊन त्यांचा बौद्धिक व शारीरिक उत्कर्ष करण्याच्या उद्देशाने व सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने, संस्थापक मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाने व मंडळाच्या अध्यक्षा मा. कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून प्रताप क्रीडा मंडळ, शंकरनगर-अकलूज ने ग्रामीण भागातील अस्सल मराठमोळा मातीतील खेळ ‘भव्य आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा’ चे आयोजन दि २१/०८/२०२२ रोजी विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल,अकलूज येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मंडळाचे संस्थापक व प्रमुख पाहुणे मा. श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, मंडळाच्या अध्यक्षा मा.कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, मा. श्री. दिपकराव खराडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी आट्यापाट्या खेळातील जिल्ह्यातील नामवंत माजी खेळाडू नारायण चव्हाण, तुकाराम पाटील, शहाजी सावंत-पाटील, बाळासाहेब ताटे देशमुख, भास्कर भोसले, शरदराव गमे, विठ्ठल काळे, विठ्ठल क्षीरसागर, बाबासाहेब क्षीरसागर, वसंत ठोकळे, दशरथ राऊत यांचा सत्कार मा. बाळदादा, मा.मदनदादा यांच्या हस्ते संपन्न झाला.
सुरुवातीला ध्वजारोहण मा.मदनदादा यांच्या हस्ते संपन्न झाले. यानंतर उपस्थित मान्यवर, विविध संघांचे संघनायक यांच्या हस्ते सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते पाटील (काकासाहेब) व श्रीमती कै. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील (आक्कासाहेब) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महर्षि गीतगायनाने शब्द पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक श्री. यशवंत माने देशमुख यांनी केले. त्यांनी मंडळाच्या स्थापनेचा उद्देश, मंडळाचा संक्षिप्त इतिहास, कार्याचे स्वरूप स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात मा. मदनदादा यांनी मंडळाच्या कार्याचे व उपक्रमाचे कौतुक केले व पुढील उज्वल कार्यास शुभेच्छा दिल्या.
यानंतर आट्यापाट्या मैदानाचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या भव्य स्पर्धेसाठी जिल्ह्यातील नेवरे, सिदाचीवाडी,कोळेगाव, पिलीव, संगम, खंडाळी, उंबरे दहिगाव, लवंग सेक्शन, कचरेवाडी, १४ सेक्शन, तांदूळवाडी, गादेगाव, सांगवी,तिसंगी, पेहे, मंगळवेढा, पंढरपूर, शिरढोन, नांदोरे, धायटी, काळमवाडी, करोळे, तारापूर, सोनके, कौठाली, जळोली, पागे उंबरे, माढा, शिरभावी या भागांतील एकूण ५२ संघांनी नोंदणी केली. स्पर्धेस प्रथम क्रमांकास रु. २१०००/ व चषक,द्वितीय क्रमांकास रु. १५०००/-, तृतीय क्रमांकास रु.१००००/- चतुर्थ क्रमांकास रु. ५०००/- अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली.
या कार्यक्रमास सुभाष दळवी, महादेव अंधारे, बाळासाहेब सणस, रामदास गायकवाड, प्राचार्य इंद्रजित यादव, मंडळाचे उपाध्यक्ष पी.एस पाटील सर, सचिव पोपट भोसले पाटील, खजिनदार वसंत जाधव, सर्व संचालक, सदस्य, विविध संघांचे खेळाडू, बहुसंख्य प्रेक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे समालोचन सुप्रसिद्ध ए एम अडसूळ, बापूसाहेब लोकरे, सूत्रसंचालन शकील मुलाणी, इलाही बागवान यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर अतिशय रंगतदार सामने सुरू झाले.