December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसर

श्री.जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगरमध्ये दहीहंडी व हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन

अकलूज (युगारंभ )-श्री.जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगर  प्रशालेमध्ये आज श्रीकृष्ण जन्मअष्टमी निमित्त दहीहंडी व हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रशाला समिती सदस्य मा. श्री महादेवराव अंधारे साहेब व कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. सौ नूतन अंधारे वहिनी होत्या.

    प्रथम सर्व मुलांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला व प्रशालेमध्ये अनेक मुले श्रीकृष्ण व राधाच्या वेशभूषा मध्ये आलेली होती.श्रीकृष्ण व राधाच्या वेशभूषेमध्ये आलेली मुलं अनेकांचे लक्ष वेधून घेत होते.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. महादेवराव अंधारे साहेब यांनी आपल्या भाषणातून सर्व मुलांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल तसेच कार्यक्रम उत्कृष्ट केल्याबद्दल सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक व पालकांचे अभिनंदन करत कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक बी .टी शिंदे सर यांनी मार्गदर्शन केले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री महादेवराव अंधारे साहेब यांच्या तर्फे प्रशालेतील सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

  आजच्या कार्यक्रमांमध्ये श्रीकृष्ण व राधा यांच्या जीवनपटाचा आढावा व महत्व प्रशालेतील सौ. कदम मॅडम यांनी घेतला प्रास्ताविक प्रशालेचे प्र.मुख्याध्यापक खंडागळे सर यांनी केले व सूत्रसंचालन सौ. पवार मॅडम यांनी केले व आभार श्री.तांबोळी सर यांनी केले कार्यक्रमासाठी प्रशालेतील बहुसंख्या माता पालकांची उपस्थिती होती.

Related posts

उत्तर प्रदेशसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार मोफत वीज

Admin

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिना निमित्त गणेश नगर अकलूज येथे पाणीपुरी फ्री 

yugarambh

पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 11,91,111 व्या साखर पोत्याचे पूजन.

yugarambh

माळीनगर -लवंगची ‘शाही ‘ ग्रामपंचायत निवडणूक

yugarambh

होमिओपॅथिचे जनक डॉ.सॅम्युअल हॅनिमन क्रिकेट चषक स्पर्धेचे अकलूज येथे आयोजन

yugarambh

‘सौंदर्य’ या निसर्गाने दिलेल्या देणगीचे जतन करण्यासाठी,सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे – स्वरूपाराणी मोहिते-पाटील 

yugarambh

Leave a Comment