माळीनगर (युगारंभ)-
“शिवसेना आणि ठाकरे बाणा,
होणार नाही कमी,
उद्धव साहेब आदेश द्यावा,
तुमचे शिवसैनिक हो आम्ही.”
या गाण्याचे गीतकार अब्दुल मुलाणी यांचा सत्कार युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी सादिक मुलाणी आणि अहमद शेख यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना अब्दुल मुलाणी म्हणाले की,
सन्माननीय उद्धवजींचे मुख्यमंत्री पद सोडतानाचे भाषण ऐकत असताना एक अतिशय उत्कृष्ट मुख्यमंत्री गमावल्याचा आघात मनावर होऊ लागला. माझे जिवलग मित्र शिवसैनिक यांच्या अंतकरणाला काय वाटत असेल याचाही विचार मनात घोळू लागला. उठून सांगू वाटत होतं साहेब आम्ही आहोत तुमच्याबरोबर,पण टीव्ही समोर बसून बोलणार कसे?लिखाणाची,गायनाची आणि संगीत बनवण्याची लहानपणापासूनची आवड असल्याने जवळच असलेला पेन आणि वही घेऊन जड अंतकरणाने मी काव्य लिहायला सुरुवात केली . प्रत्येक शिवसैनिक,कट्टर शिवसैनिक मनातून काय विचार करत असेल हे मांडण्याचा प्रयत्न करत गेलो आणि माझ्याकडून अवघ्या पाच ते सहा मिनिटांमध्ये हे गीत लिहून झाले .तळमळ स्वस्त बसू देत नव्हती. महाराष्ट्रातील शिवसैनिक खडबडून जागा व्हावा हाच उदात्त हेतू घेऊन मी गाणे रेकॉर्डिंग च्या कामाला लागलो .यामध्ये माझे जिवलग, मित्र सहकारी, वादक, असे जवळपास 20 ते 22 लोक आम्ही या गाण्यावरती काम करू लागलो आणि पाहता पाहता हे गीत तयार झाले .
मी आणि माझे सहकारी यांनी हे शिवसैनिकांच्या भावना मांडणारे गीत युट्युब वरती प्रसारित केले आणि समस्त महाराष्ट्रातून या गीताला उदंड प्रतिसाद मिळाला. माझ्यावरती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. हजारो फोन फक्त आणि फक्त माझं कौतुक करत होते.याच फोनमध्ये निर्भीड कडवट शिवसैनिक शुभेच्छा देताना पाहिला,तर काही शिवसैनिक भावनिक होऊन आमच्या भावना आपण मांडल्या असं सांगून अक्षरशः अश्रूंना वाट मोकळी करून देत होते . या माध्यमातून मला खरा शिवसैनिक जवळून अनुभवता आला.
महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिकांना प्रेरणा देतील अशी पोवाडे गीते घेऊन मी आपणांसमोर येऊ असे आश्वासन दिले.
यावेळी संगम ग्रामपंचायत सदस्य,प्रशांत पराडे,संजय पराडे, नितीन इंगळे,तात्या पराडे,अक्षय पराडे,अविनाश भोई,सागर इंगळे, विकास भोई, ओम पराडे,शंभू पराडे, नरा पाटील,साहिल हुंबे, रज्जाक मुलानी,इरफान मुलानी, प्रवीण पराडे,उमेश धनवडे,दीपक भोई, राम ढेंबरे हे युवा सैनिक उपस्थित होते