December 1, 2023
yugarambh
Breaking News
राजकीयराज्य

उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे महाराष्ट्रातील धनगर समाजासाठी गाऱ्हाणे

लवंग (युगारंभ )-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आ.श्री.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान मंडळात भेट घेवुन महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन दिले.

  • राज्यातील धनगर समाजातील महिला बंदिस्त सहकारी संस्थांना विशेषत: विदर्भ, उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद, सोलापूर व सांगली जिल्ह्यात मेंढपाळ महिला भटकंती करतात.ही भटकंती बंद होण्याकरिता महिलांना घरच्या घरी बंदिस्त मेंढपाळ उद्योग निर्माण होण्याबाबत शासनामार्फत बंदिस्त शेळी व मेंढी पालन सहकारी संस्थांना बहुजन विभागाकडून प्रायोगिक तत्वावर संस्थांना आर्थिक निधी मंजुर करावा.

पारंपारीक धनगरी गजनृत्य करणाऱ्या कलाकारास शासनाकडून प्रतिमहा २०००/- रुपये मानधन मिळणेबाबत.

पारंपारीक ढोल, डपडे, शिंगाडे, सुर, पिपाणी वाद्य वाजविणाऱ्या कलाकारांना महाराष्ट्र शासनाकडून
प्रतिमहा ५०००/- रुपये मानधन देण्यात यावे

पारंपारीक लोककला धनगरी ओव्या गायकास व त्यांच्या सोबतच्या वाद्य वाजंत्र्यास दरमहा रुपये ५०००/- मानधन मिळावे.

📌 धनगर समाजाची शेकडो वर्षापासून पारंपारीक कला जोपासण्यासाठी या कलाकारांना रोजीरोटी मिळवून देण्यात यावी व ही कला जिवंत ठेवण्यासाठी तसेच धनगर समाजातील आर्थिक सक्षम करण्यासाठी बहुजन विकास, मागास विभागामार्फत धनगर समाजाच्या मागण्या मान्य करणेबाबत सहकार्य करावे.

अशाप्रकारे विविध मागण्या आमदार मा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे केल्या.

Related posts

तुमचं-आमचं जमेना अन् तुमच्याशिवाय भाषणच होईना; पंतप्रधानांच्या तासाभराच्या भाषणात फक्त काँग्रेस

Admin

अकलूज मधे युवासेनेच्या वतीने गद्दारांची अंत्ययात्रा .

yugarambh

पंचायत समिती इंदापूर येथे महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

yugarambh

वीज वितरणचे कर्मचारी उद्यापासून संपावर पण,वीजपुरवठा खंडित होणार नाही

yugarambh

श्री अनिल प्रभाकर जाधव सर यांना राज्यस्तरीय कै. आर्वे सर स्मृती आदर्श क्रीडा (क्रिकेट/बास्केटबॉल कोच) प्रशिक्षक पुरस्कार प्रदान 

yugarambh

आमच्या बारक्यापणी भाग 2- प्रा. गणेश करडे

yugarambh

Leave a Comment