लवंग (युगारंभ ): युवा सेना उपजिल्हा प्रमुख विक्रम उर्फ सोनू पराडे पाटील व बाभूळगाव चे उपसरपंच भूषण भैय्या पराडे पाटील यांच्या हस्ते वाघोली ता. माळशिरस गावचे नूतन सरपंच योगेश माने- शेंडगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वाघोली चे उपसरपंच पंडित मिसाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य बळीराम पाटील,तुषार पाटोळे, अमोल मिसाळ, लक्ष्मण पारसे, अविनाश गाडे यांचाही सत्कार बाभूळगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना विक्रम उर्फ सोनू भैय्या पराडे पाटील म्हणाले की माळशिरस तालुक्यात वाघोली या गावांमध्ये प्रस्थापितांची बरेच वर्ष झाले सत्ता होती. त्यांची सत्ता तरुण तडफदार युवक योगेश माने शेंडगे यांनी तरुणांच्या बळावर वाघोली ग्रामपंचायत स्वतःच्या ताब्यात घेतली आजच्या घडीला युवक हा प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन घडवू शकतो हे योगेश माने शेंडगे यांनी दाखवून दिले व तरुणांची फळी काय करू शकते हा एक आदर्श निर्माण करून दाखवला.
यावेळी माजी सरपंच दिलीप भाऊ पराडे , पंजाब पराडे,बाभूळगावचे तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत (नाना) पराडे, बाळासाहेब पराडे सर, लालासाहेब पराडे, सरपंच धनाजी सुरवसे, विकी पराडे,जयेश पराडे, शंकर (अण्णा) पराडे, गोविंद मिटकल,गणेश पराडे रोशन पराडे, गोटु पराडे, अनिल बापू पराडे, बबलू पाटील, पापू पराडे, निखिल गायकवाड, विजय पराडे, अशोक पराडे, अक्षय पराडे, विनोद पराडे, किरण पराडे, गणेश गोडसे, सचिन पराडे, कुमार पराडे, अक्षय पराडे, रोहन पराडे, मोहन पराडे, देविदास पराडे, सोमा गायकवाड , सतिश काकडे सीताराम पराडे अभिजित पराडे इ शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते…