November 28, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसर

समावि प्राथमिकचे  बालचमू गेले ऐतिहासिक व पुरातन मंदीर भेटीला

माळीनगर/ प्रतिनिधी-सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज प्रशालेतील बालचमूंनी दिल्या पुरातन ऐतिहासिक मंदिरांना भेटी.दिनांक 25 रोजी अकलूज सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज प्रशालेतील शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गाच्या वतीने अकलूज पूर्वभागातील ऐतिहासिक व पुरातन मंदीर परिसर भेटीचे आयोजन करण्यात आले.

     सर्वप्रथम गणेशगाव ता. माळशिरस येथील सुप्रसिद्ध अशा स्वयंभू गणपती मंदीरास भेट दिली. या मंदीरातील मनमोहक गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर शिक्षकांनी येथील परिसराविषयी माहिती दिली .

त्यानंतर तेथून जवळच असेलेले नृसिंहपूर ता.इंदापूर येथील पुरातन व ऐतिहासिक मंदीरास भेट दिली.दुपारच्या उन्हाच्या तीव्रतेत देखील मंदीरातील गारवा मनाला अनामिक शांतता देत होता. तेथील मंदीर सदस्य काकडे महाराज यांनी भक्त प्रल्हादाची कथा सांगून भगवान नृसिंह यांचा व मंदीराच्या इतिहासावर दृष्टीक्षेप टाकला त्यांनी दिलेल्या माहितीबद्दल प्रशालेच्या वतीने श्रीफल देऊन त्यांचा सत्कार केला. त्यानंतर निरा व भीमा नदीच्या संगमावरील घाटावर नेऊन विद्यार्थांना तेथील माहिती दिली.पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे दुथडी भरून वाहणार्या नदीच्या संगमावरील चित्र मनमोहक असेच होते.

त्यानंतर महाळुंग येथील पुरातन यमाई देवीच्या मंदीराचे दर्शन घेतले. तेथील दगडी बांधकाम, पाण्याचा कुंड, दिपमाळ आणि देवीची मनोहारी मुर्ती पाहून विद्यार्थी आनंदून गेले.तेथील माकडांना पाहून काही मुलं घाबरली तर काहींनी केळी, फुटाणे त्यांना खाऊ म्हणून दिला.

*संस्थेचे मार्गदर्शक संचालक जयसिंह , मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, प्रशाला समिती सभापती स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून प्रशालेच्या मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली* इयत्ता प्रमुख व सहकारी शिक्षकांच्या वतीने या परिसर भेटीचे आयोजन करण्यात आले .

सायंकाळी पाच वाजता परिसर भेटीची सांगता झाली.या साठी स्कूलबस कमिटीचे विशेष सहकार्य लाभले. 

 

आपल्या परिसरात अनेक पुरातन व ऐतिहासिक गोष्टी, वास्तू आहेत याची विद्यार्थांना लहानपणापासून माहिती व्हावी व अभिमान त्यांच्या मनामध्ये रूजवा या हेतूने या परिसर भेटीचे आयोजन केले .
नूरजहाँ शेख 

मुख्याध्यापिका स.मा.वि. प्राथमिक विभाग अकलूज.

Related posts

अकलूज नगरपरिषद व अकलूज पोलीस यांच्या तर्फे संयुक्त स्वच्छता अभियान

yugarambh

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळे बिस्कीट वाटप

yugarambh

गृहविज्ञान महिला महाविद्यालयात वृक्षारोपणासाठी रोपांच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेच्या १५०० मुलींनी केले संविधानाचे वाचन

yugarambh

ताराराणीचे पहीले राष्ट्रीय पदक..!-मा. धैर्यशील मोहिते -पाटील

yugarambh

सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त ‘विज्ञान झेप’ व ‘शेतशिवार’ या अंकांचे प्रकाशन

yugarambh

Leave a Comment