माळीनगर (युगारंभ )-भारतीय कुस्ती महासंघ आयोजित रोहतक (हरीयाना) येथे संपन्न झालेल्या 15 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत फ्री स्टाईल 36 किलो वजन गटामध्ये कास्य आपल्या ताराराणी महिला कुस्ती केंद्राच्या पै.वेदिका शेंडे हिने कास्य पदक मिळवले, वेदिकाच्या या यशाबद्दल प्रचंड आनंद व्यक्त होत आहे.
सहकार महर्षी कै.शंकरराव मोहिते पाटील, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय श्री.विजयसिंह मोहिते पाटील, आदरणीय श्री.जयसिंह मोहिते पाटील व आदरणीय श्री.मदनसिंह मोहिते पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातून “कुस्ती” जोपासली वाढवली,आज देखील मोहिते-पाटील परीवार कुस्ती खेळाला राजश्रय देत आहे.
आधुनिक काळात कुस्तीचे स्वरूप देखील बदलले,आखाड्याची कुस्ती मॅटवर खेळली जाऊ लागली महीला मल्ल देखील पुरूषांच्या बरोबरीने कुस्तीचा आखाडा गाजवू लागल्या मात्र महाराष्ट्रातील महिलांची कुस्ती म्हटलं की बहुतांश ग्रामीण भागात विराेध दर्शवला जाताे तर शहरात या खेळाला आता पसंती दर्शवली जाते ही विषमतेची सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी धैर्यशील भैय्यासाहेब व सौ.शितलदेवी मोहिते पाटील यांनी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
ग्रामीण महाराष्ट्रात महिलांची कुस्ती रुजवण्यासाठी व महिला मल्लांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी अकलूज येथे महिलांसाठी २०१७ साली अद्ययावत असे ताराराणी महिला कुस्ती केंद्र उभारण्यात आले आहे.ग्रामीण भागातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील चमकदार कामगिरी करण्यासाठी देखील राष्ट्रीय दर्जाचे गुणवत्तापूर्ण व उच्च दर्जाचे प्रशिक्षणाची गरज असते या मूलभूत अनुषंगाचा विचार करून हरियाणा राज्यातील काॅमनवेलथ विजेती गीता फोगट यांचे द्रोणाचार्य महावीर फोगट कुस्ती केंद्राचे मुख्य प्रशिक्षक राहीलेले सतपालसिंह यांना ताराराणी महीला कुस्ती केंद्रास प्रशिक्षण देण्यास पाचारण करण्यात आले आहे.या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात मॅटवरील कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात आहेत. त्याशिवाय जिम, व्यायाम, संतुलित आहार या सर्व गोष्टींवर बारीक लक्ष दिले.

राज्यभरात कुस्ती आखाड्यांचे स्वरूप आजही पारंपरिक लाल मातीचेच आहे. राष्ट्रीय,काॅमनवेलथ ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू घडवण्यासाठी मॅटवर खेळणे ही काळाची गरज बनली आहे. परंतु ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी मॅटची व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची तसेच राष्ट्रीय प्रशिक्षकांची सुविधा उपलब्ध नसल्याचा फटका कुस्तीमध्ये कारकीर्द घडवू इच्छिणाऱ्या खेळाडूंना बसतो म्हणूनच राष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्ती खेळाडू घडवण्यासाठी त्यासाठी बेसिक सुविधा पुरवण्यात पासून ते राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत आहोत यांचा जास्तीत जास्त होतकरू खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन धैर्यशील भैय्या यांनी केले आहे.
२०१८ साली प्रशिक्षण केंद्र सुरू केल्यानंतर सौ.शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “ताराराणी” मधील महिला मल्लांनी तालुका,जिल्हा अगदी राज्यपातळीवरील पदके मिळवली चार वर्षांनी “ताराराणीस” पहीले राष्ट्रीय पदक मिळाले,आपण जिद्दीने सुरू केलेल्या ताराराणी महिला कुस्ती केंद्राला पहिले राष्ट्रीय पदक मिळाल्याबद्दल एक मनस्वी अभिमान वाटतोय.
इंग्रजी भाषेतील म्हणी प्रमाणे slow but steady wins the race! म्हणत आपल्या परीसरातील ग्रामीण भागातील महिला मल्ल ताराराणी कुस्ती केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली पाहीजे या ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत आहोत. -धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील