माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित,सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग ,अकलूज प्रशालेत आज इयत्ता २ री ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा “मातीकाम” हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी घरुन येताना वेगवेगळ्या प्रकारची माती आणली होती.त्यामध्ये लाल माती, काळी माती,मुंबई माती असे मातीचे वेगवेगळे प्रकार आणले होते.
यावेळी कलाशिक्षक श्री.धोत्रे सर यांनी स्टेज वरुन सर्वांना मातीकामाचे प्रात्यक्षिक सादर करुन दाखवले.सर्व विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकाकडे बारकाईने लक्ष देत गणपती बाप्पा ची सुंदर अशी मूर्ती तयार केली.काही काही विद्यार्थी तर देहभान हरपून अगदी मनापासून मूर्ती बनवत होते. काहींच्या चेहऱ्यावर आपण मूर्ती बनवल्याचा आनंद जाणवत होता.काहींनी मूर्तीला रंग देऊन मूर्ती अजून सुबक बनविण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी.त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा,प्रोत्साहन मिळावे म्हणून या उपक्रमाचे आयोजन प्रशालेतर्फे करण्यात आले.हा उपक्रम प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.शेख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ठपणे पार पाडण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.शेख मॅडम, इयत्ता २ री ते ४ थी चे सर्व इयत्ता प्रमुख,सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री.प्रदीप मिसाळ सर यांनी केले व प्रात्यक्षिक श्री.लक्ष्मण धोत्रे सर यांनी केले.