माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित, रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्राथमिक शाळा, नातेपुते या प्रशालेची शैक्षणिक वर्ष 2022/2023मधील माहे ऑगस्ट 2022ची मासिक सभा आज दिनांक 30/8/22रोजी संपन्न झाली.सभेला इयत्ता 1ली ते 4थीचे पालक उपस्थित होते.
सुरूवातीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ.ढमाळ मॅडम यांनी प्रास्ताविक केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात शालेय व्यवस्थापन माहिती,विविध उपक्रम माहिती आणि नेहमी पालकांचे सहकार्य असते हे सांगितले.सौ.शिदे मॅडम यांनी अध्यक्षपद निवडीस अनुमोदन दिले.
श्री.निंबाळकर सर यांनी शाळेची शिस्त, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत शिक्षकांची भूमिका,पालकांची विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत जागरूकता,शाळेच्या विकासात पालकांच्या सहकार्याची अपेक्षा इत्यादी विषयांचा आढावा घेतला.
पालकांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र नातेपुते,डॉ.सौ.कुंभार मॅडम यांनी आपल्या मनोगतात पालकांची जबाबदारी ,कोरोना काळात खुंटलेली शैक्षणिक प्रगती,टि.व्ही.चा परिणाम,शिक्षणाचे महत्त्व इत्यादी विषयांचा आढावा घेऊन उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.
शेवटी सभेचे अध्यक्ष मा.श्री.रोटे साहेब यांनी आपल्या मनोगतात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष,माता पालक संघाचे अध्यक्ष व सर्व समित्यांचे सदस्य तसेच पालकांचे शाळेच्या विकासात नेहमीच सहकार्य राहील हे सांगितले.
सभेचे सूत्रसंचालन श्री.निगडे सर यांनी केले.छोटा/मोठा गटाच्या सौ.शिंदे मॅडम यांनी महिला पालक बैठक व्यवस्था पार पाडली.सभेतील सर्व मान्यवरांचे व उपस्थित पालकांचे आभार पर्वते सर यांनी मानले.मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.