अकलूज (युगारंभ )-संग्रामनगर, सुमित्रा कॉलनी येथील संग्रामसिंह गणेशोत्सव मंडळ च्या गणपती ची 4सप्टेंबर ची संध्याकाळची आरती सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह (बाळदादा )मोहिते -पाटील व चि. अखिलेश अनिल भगत, अर्णव अभिजित राजगुरू यांच्या शुभहस्ते महादेव अंधारे, सुरेश पवार, पंकज गाडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाली.
सदर आरती नागन्नाथ चंद्रकांत कुलकर्णी (काका )यांनी केली.यावेळी मंडळाच्या वतीने ग्रा. सदस्य पंकज गाडे यांनी जयसिंह मोहिते पाटील आणि महादेव अंधारे यांचा फेटा श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.
संग्रामसिंह गणेशोत्सव मंडळाचे यंदा 28वे वर्ष असून या मंडळाची स्थापना 1994साली संस्थापक बाळासाहेब गाडे यांनी आपल्या सहकारी मित्रांसमवेत केली.. या मंडळामार्फत प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच प्रत्येक वर्षी गणेश जयंती आणि गणेश विसर्जन ला परिसरातील नागरिकांसाठी अन्नदान केले जाते.
मंडळाचे अध्यक्ष उमाकांत गाडे, उपाध्यक्ष सागर जाधव, खजिनदार निखिल भोसले आहेत.याप्रसंगी सहकार महर्षी कारखान्याचे नर्सरी विभाग प्रमुख सुरेश पवार, संग्रामनगर ग्रामपंचायत सदस्य पंकज गाडे,माजी ग्रा. सदस्य विठ्ठल रेवंडे (सर ), बाळासाहेब गाडे,माजी उपसरपंच उमाकांत गाडे,पत्रकार गणेश जाधव,सागर जाधव,बाळासाहेब पवार, अनिल भगत (सर )रणजित गाडे, रोहित (पप्पू )पवार, निखिल भोसले, अभिजित राजगुरू, ओंकार साने,अमोल पवार,सौरभ लोंढे, प्रियांशु (पणी )गाडे, रणजित जाधव, आकाश गाडे, प्रज्योत कारंडे, प्रज्वल (सनी )गाडे, विशाल सावंत, कृष्णा ठोंबरे,रोहित वाघमारे,ऋतुराज जाधव,शहाजी जगताप व परिसरातील नागरिक उपस्थित होते.