माळीनगर (युगारंभ )-सोमवार ५ सप्टेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता नातेपुते येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी त्यांना शुभेच्छा देऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

निवेदनामध्ये अकलूज क्रिटिकल केअर अँड ट्रॉमा सेंटर या हॉस्पिटलची आरोग्य विभागाच्या उच्चाधिकार समितीमार्फत सखोल चौकशी करून सदर हॉस्पिटलचे लेखापरीक्षण करून कारवाई करणेसाठीच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त पुणे व जिल्हाधिकारी सोलापूर येथे दोन वेळा आंदोलन करण्यात आले परंतु पुरावे देऊनही आजपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर कारवाई न झाल्यास सार्वजनिक आरोग्यमंत्री असल्याने आपल्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सदर निवेदनाची गंभीर दखल घेऊन तात्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागाच्या रिक्त जागा त्वरित भरून माळशिरस तालुक्याची आरोग्य व्यवस्था सुरळीत करावी यासह आरोग्य विभागाच्या इतर मागण्यांचे निवेदन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष,माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक सोमनाथ भोसले यांनी दिले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे हेमंत कांबळे,पांडुरंग चव्हाण,विश्वास उगाडे,शिवाजी खडतरे आदी पदाधिकारी उपस्थित होते…