यशवंतनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यशवंतनगर प्रशालेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती.. अर्थात शिक्षक️ कार्यक्रम उत्साहात पार पडला.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती माळशिरस च्या माजी सदस्या डॉ.सौ.शैलजा गुजर होत्या, तसेच लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघ आणि प्रमोद इनामदार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .
सर्वप्रथम… सर्वांचे स्वागत करून मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी आणि डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन झाले . सर्व मान्यवरांचा सत्कार संपन्न झाल्यावर सर्व गुरुजनांचा सन्मान प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.गुजर यांच्या हस्ते संपन्न झाला.
इयत्ता ४ थी च्या बालचमुंनी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण याप्रसंगी केले.शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित.. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्या मुलांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांनी केले.सहशिक्षिका सुषमा काशीद यांनी स्वलिखित ‘संस्काराचे मोती’ हे पुस्तक पाहुण्यांना भेट म्हणून दिले.
प्रशालेतील इयत्ता ४ थी तील विद्यार्थिनी कु.गुंजन कारमकर हिने भाषण केले, तर शिक्षक देवानंद साळवे सरांनी अतिशय साध्या, सोप्या शब्दात शिक्षक दिनाचे महत्त्व व आपल्या गुरूप्रती आपण श्रद्धा ,निष्ठा,विश्वास कायम ठेवावा असे सांगत .देवापेक्षा गुरू श्रेष्ठ असतात कारण ते आपल्याला देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवतात असे मनोगत व्यक्त केले.
ही शाळा दर्जेदार शिक्षणासोबतच मुलांचा सर्वांगीण विकास करते असे प्रमुख पाहुणे इनामदार काका यांनी सांगितले..याप्रसंगी काकांनी सर्व गुरूजनांना श्री गुरुचरित्र अध्याय ४० वा हे पुस्तक भेट दिले.
मुलांनी आपले आरोग्य चांगले ठेवावे.मोबाईलचा वापर कमी करून दररोज अभ्यास करावा..आई,वडील तसेच आपले गुरूंचे ऐकावे असे डॉ.सौ.शैलजा गुजर यांनी आपल्या मार्गदर्शनात मुलांना सांगितले .
सूत्रसंचलन कु.सिद्धी वाघ हिने केले.आभार सोहम एकतपुरे याने मानले.या कार्यक्रमाचे सर्व नियोजन इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांनी केले होते..इयत्ता ४ थी चे सर्व शिक्षक सर्वश्री गायकवाड, लिके, राजगुरू,मुलाणी आणि शिक्षिका गोडसे,शेख, देसाई तसेच प्रशालेतील सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापक शिवाजी पारसे सर यांच्या मार्गदर्शनानुसार सदर कार्यक्रम उत्साहात पार पाडला.