December 1, 2023
yugarambh
Breaking News
परिसर

प्रगत व कृतिशील विचारधारा मा. गणेशजी करडे सर

कराड (युगारंभ )-कर्तृत्वात भरारी भरवणारा, तरूणांच्या मनाला उभारी देणारा, सर्वांना आपलासा वाटणारा युवा नेता, सर्वगुणसंपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच मा. गणेशजी करडे सर होय.


    स्वतः बरोबरच दुसऱ्यांवर तितक्याच आपुलकीने प्रेम करणार्‍या सरांनी युवा वर्गामध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे तरुणांचा पाठीराखा व बुलंद आवाज म्हणूनच तरुणांच्या मनात घर करून राहीले आहेत. ज्यांच्या आवाजातच आकाशाची विशालता व सागराची उदारता अशी लोकप्रियता असणारे मा. करडे सरांच्या बद्दल बोलावे तेवढे कमीच असून सरांच्या वाढदिवसानिमित्त नकळत एक झलक………..

चंदनाला कशाचा लेप द्यावा, अमृताला कशाने राधावे, गगनाला कशाचा मंडप घालावा म्हणजे त्याची उत्तुंगता दिसेल हे जसे सांगणे जसे अवघड आहे तसेच सरांना शब्दात व्यक्त करणे अवघडच आहे. नेहमीच संघर्ष, लढा या शब्दांनी नाते जोडून दिनदुबळ्या, सर्वसामान्य होलार समाजासाठी नेहमीच क्रियाशील असणारे सर नेहमीच युवकांचे आशास्थान आहेत.


     पुण्यात असताना असो वा अकलूजमध्ये आल्यानंतर ही असो अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी सरांना शांत बसुच देत नाही. समाजाच्या विविध प्रकारच्या प्रश्नासाठी अनेक अंदोलनात अग्रभागी राहून झुंज देणे हिच खरी ओळख झाली आहे. होलार समाजातील युवावर्ग व्यसनाच्या, कर्जाच्या कचाट्यातून उत्तम मार्गदर्शन करून सहीसलामत सोडवणे व समाजात शिक्षणाचा पाया मजबूत करणे तसेच शासनदरबारी धुळ खात पडलेल्या मागण्यांचा आपल्या सडेतोड पत्रकारितेतून आवाज उठवणे हे स्वप्न उराशी बाळगून जगणारी प्रगत व कृतिशील विचारधारा म्हणजेच करडे सर आहेत. सर एक उदयोन्मुख उत्तम पत्रकार आहेत.

    समाजाच्या हितासाठी चालणारी सरांची धडपड समाजबांधव अगदी जवळून पाहत आहेत. त्यामुळे सर व समाजबांधव यांच्यामधील भावनिक नात्यांची विण अधिक घट्ट गेली आहे. सरांचा स्वभाव व त्यांनी मांडलेली मते जहाल असली तरी त्यात खुपच सच्चेपणा असतो. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आपलं मत बेधडकपणे मांडतात.
        नवनवीन शैक्षणिक संकल्पना समाजात रुजविण्यासाठी हवी असलेली मानसिक तयारी व लवचिकता त्यांच्याकडे आहे. सचोटी, प्रामाणिकपणा, समाजाप्रती असलेली निष्ठा व समानतेसारख्या शाश्वत मुल्यांवर असलेला विश्वास, विवेक अश्या चांगल्या गुणांचा समुच्चय त्यांच्या ठायी आहे. मुल्यांशी कुठेही तडजोड न करता केलेले समाजकार्य हे त्यांच्या समाजाशी असलेल्या नात्याची ग्वाहीच देते.

अश्या या उत्तुंग व्यक्तिमत्वाला उत्कर्षाची किनार मिळावी आणि सहयोगाच्या होडीतून सरांच्या जिवनाची वाटचाल व्हावी व त्यांना उदंड आयुष्य लाभावे ह्याच जन्मदिनी शुभेच्छा 💐💐
🙏🏻🎂💐🙏🏻🎂💐🙏🏻🎂💐
🖊
मनोज हातेकर (कराड दक्षिण)

Related posts

पावसाळा आणि आयुर्वेद-डॉ. हर्षवर्धन वसंतराव गायकवाड

yugarambh

किती महागले गहू, तांदूळ? गेल्या पाच वर्षातील दरवाढीची केंद्राने दिली माहिती

Admin

श्री जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगर मधील बालचमुनी भरवला आठवडा बाजार

yugarambh

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माळीनगर येथे आजी माजी सैनिकांचा सन्मान

yugarambh

जागतिक महिला दिन ‘मॉडेल विविधांगी प्रशालेत’ मोठ्या उत्साहात साजरा

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेच्या १२०० विद्यार्थिनींची प्रभातफेरी

yugarambh

Leave a Comment