माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशाला अकलूजच्या मुख्याध्यापिका मंजुश्री दिपक जैन नियतवयोमानानुसार ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्या त्याबद्दल आज त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक-संचालक जयसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.जैन मॅडम यांनी डी एड् कॉलेज मध्ये शिक्षक, माध्यमिक विभागामध्ये शिक्षक,पर्यवेक्षक व मुख्याध्यापक अशा विविध पदांवर सेवा केली.विद्यालयातील रत्नाई वाद्यवृंदाच्यावतीने विद्यार्थिनी व संगीत शिक्षक सुहास पवार यांनी सुंदर गीत गाऊन मॅडमना निरोप दिला.
मंजुश्री जैन बोलताना म्हणाल्या की मी खूप भाग्यवान आहे की एवढ्या मोठ्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेत मका सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले व कायम या संस्थेच्या ऋणात राहील अशी भावना व्यक्त केली.
जैन मॅडम यांचे पती दिपक जैन,प्रशाला समितीच्या सदस्या नयना शहा,विद्यार्थिनी स्नेहल वाळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी विचार व्यक्त करताना जैन मॅडम यांनी शाळेसाठी दिलेले योगदान सांगितले.सोलापूर जिल्ह्यात जिजामाता कन्या प्रशाला उत्कृष्ट उपक्रम शील शाळा बनवण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याचे सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जयसिंह मोहिते-पाटील यांनी जैन मॅडम यांच्या शैक्षणिक प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले.विद्यार्थीप्रिय,शिस्तप्रिय, उपक्रमशील-आदर्श मुख्याध्यापिका सेवानिवृत्त होत आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मंजुश्री जैन यांना शुभेच्छा देण्यासाठी संस्थेचे संचालक तात्या एकतपुरे, सचिव अभिजित रनवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,प्रशाला समितीच्या सदस्या शोभना शहा,मनीषा चव्हाण,गिरीजा उघडे,रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल सुर्वे,महिला वसतिगृहाच्या अधीक्षक निंबाळकर मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नूतन प्रभारी मुख्याध्यापक कल्लाप्पा सूर्यवंशी सर यांनी केले.सूत्रसंचालन दिग्विजय जाधव व यशवंत माने-देशमुख यांनी केले तर अनुराधा निंबाळकर यांनी आभार मानले.