December 1, 2023
yugarambh
Breaking News
जिल्हापरिसर

मुलींचा शारिरीक विकासातून सर्वागिण विकास व्हावा…. डाँ.प्रिया कदम

अकलूज (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर या प्रशालेत दिनांक 12 सप्टेंबर रोजी स्पर्श ज्ञान व मुलींचे आरोग्य हा उपक्रम राबवण्यात आला.

 प्रथमत: जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील साहेब व श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील आक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन डाँ. प्रिया कदम,(MBBS,DGO,DNB) ,प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख व्याख्यात्यांचा सन्मान शिक्षिका प्रतिनिधी गुजरे मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

 

    सर्व विद्यार्थिनींना चांगले स्पर्श कोणते व वाईट स्पर्श कोणते यातील फरक लक्षात यावा व परिसरात वावरत असताना सर्व स्पर्शांची जाणीव होणे हा मुख्य हेतू समोर ठेवून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे मुलींच्या आरोग्य विषयक समस्यांविषयी विद्यार्थिनींमध्ये जागरूकता निर्माण करणे हा उद्देश या उपक्रमातून साध्य झाला.

 

    विद्यार्थिनींना किशोरवयीन मुलींमध्ये वाढीसाठी आवश्यक असणारा डायट ,मुलींच्या आरोग्य विषयक असणाऱ्या समस्या याविषयी मार्गदर्शन करताना पीपीटी तंत्राचा उपयोग करून माहिती अतिशय रंजक पद्धतीने सांगण्यात आली. व्याख्यानातील प्रत्येक माहिती मुली ह्या लक्षपूर्वक ऐकत होत्या. त्याचप्रमाणे शारीरिक बदल होत असताना मानसिक बदल कसे हाताळावे याविषयी ऊहापोह केला.

Good touch and bad touch यामधील फरक ओळखून आत्मविश्वासाने यावर कशी मात करावी, बदलत्या काळात महिला व मुलींनी स्वतःची सुरक्षा कशी करावी ,त्याचबरोबर आरोग्यविषयक जीवनशैली कशी सुधारावी याबाबत अनमोल असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रचना रणनवरे यांनी केले.सूत्रसंचालन प्रतिभा राजगुरू तर आभार स्नेहलता एकतपुरे यांनी केले.

Related posts

दादा कोंडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त, झाल्या तिन्ही सांजा कार्यक्रम संपन्न

yugarambh

संस्कृती जतन करणे आणि वाढवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे-.सौ.मीनाक्षी जगदाळे

yugarambh

युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा

yugarambh

जिजामाता कन्या प्रशालेत महिला दिन उत्साहात साजरा

yugarambh

Param Bir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द होणार?

Admin

मुलींनी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम बनले पाहिजे – स्वरूपाराणी मोहिते-पाटील

yugarambh

Leave a Comment