माळीनगर (युगारंभ )-राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे, राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या अकलूज शहर युवक कार्याध्यक्षपदी कबीर मुलाणी यांची निवड राज्य कार्यकारिणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आली.
कबीर मुलाणी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारणी सदस्य व सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी हार फेटा बांधून सत्कार करून शुभेच्छा दिल्या व वाढदिवसाची भेट म्हणून अकलूज शहर कार्याध्यक्षपदी निवड करून निवडीचे पत्र दिले.
निवडीला उत्तर देताना कबीर मुलाणी म्हणाले की….
जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून पीपल्स रिपब्लिकन पार्टीची ताकद अकलूज शहर व परिसरात वाढवणार असल्याचे सांगितले.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे हेमंत कांबळे, शिवम गायकवाड, पांडुरंग चव्हाण, विश्वास उगाडे, शिवाजी खडतरे, अशोक कोळी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते