माळीनगर (युगारंभ )- सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभाग अकलूज प्रशालेत फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका नूरजहाँ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली छोटा गट व मोठा गट यांचे वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, समाजसेवक, महापुरूष आदी आर्कषक वेषभूषा साकारल्या होत्या. त्या वेषभूषेत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन सामाजिक संदेश मांडले.
त्यानंतर प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले.स्पर्धेचे परीक्षण वंदना पवार, रेश्मा चिंचकर,सोफिया कोरबू , सीमा पाटोळे यांनी केले.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा.त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा,प्रोत्साहन मिळावे म्हणून या उपक्रमाचे आयोजन प्रशालेतर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगळे मॅडम यांनी केले.यावेळी सर्व पालक, शिक्षिका उपस्थित होते