माळीनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित;लक्ष्मीबाई कन्या प्रशाला, यशवंतनगर प्रशालेत ‘हिंदी दिन’मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वाघ मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री. पिसे सर,शिक्षक वृंद व विद्यार्थिनींच्या शुभ हस्ते सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता नववी तुकडी ब या वर्गाने केले होते .कु. *ऋतुजा एकतपुरे* हिने हिंदी दिन निमित्त आपले मनोगत व्यक्त केले. आपले मनोगत व्यक्त करत असताना तिने हिंदी भाषेचे महत्व, हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा असलेला दर्जा या विषयी माहिती दिली.
यावेळी इयत्ता नववी तुकडी ब या वर्गाने हिंदी नाटिकेचे सादरीकरण केले या नाटिकेचे शीर्षक होते *’हिंदी भाषा का महत्व’* यामध्ये आठ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
कु.*तनिष्का होनमाने या विद्यार्थिनींने भारत माते ची भूमिका बजावली, कु. संचिता पवार बंगाली नागरिक, कु.वेदिका खिलारे तमिळ नागरीक, कु.तृप्ती काळे इंग्रजी भाषिक नागरिक, कु.मुस्कान चव्हाण पंजाबी नागरिक, कु.संजना शिंदे गुजराती नागरीक,कु. ऋतुजा एकतपुरे हिंदी भाषा पात्र तसेच कु.प्रणाली गायकवाड हिने मराठी नागरिकाची भूमिका बजावली.*
या नाटिकेतून विद्यार्थिनींनी *हिंदी भाषेचे महत्व* स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक *कु. चैत्राली साठे* हिने केले. सूत्रसंचालन कु. *सायली फिरमे* व कु. *प्रज्ञा सुरवसे* यांनी केले. अनुमोदन *कु. सिमरन शेख* हिने दिले. आभार *कु. तनुजा भालके* हिने मानले.