माळीनगर (युगारंभ )- केंद्र शासनाद्वारे आर्थिक दुर्बल घटकासाठी शिष्यवृत्ती योजना ( एन.एम.एम.एस. ) परीक्षा घेण्यात आलेल्या .या परीक्षेत जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकलूज मधील किर्ती अंकुश कदम व शिवांजली धनाजी पवार या दोन विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्या आहेत.

त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते-पाटील,अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील,सभापती सुलक्षणादेवी मोहिते-पाटील,संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील,सचिव अभिजित रनवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील,मुख्याध्यापक कल्लाप्पा सुर्यवंशी यांनी या दोन्ही यशस्वी विद्यार्थिनींचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.