लवंग (युगारंभ )-वाफेगाव ता. माळशिरस येथे अनैतिक संबंधातुन महिलेचा खून झाल्याची घटना 19 सप्टेंबर रोजी घडली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.दरम्यान अकलूज पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 544/2022 भा.द.वि.सं 302, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून फिर्यादी – मोहन शंकर बनसोडे (वय – 42 वर्ष ) धंदा – शेती रा.बनसोडे वस्ती वाफेगाव,तालुका माळशिरस, जिल्हा – सोलापूर यांनी अकलूज पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. आरोपी – शंकर दिगंबर सरवदे रा. वाफेगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. याला अटक करण्यात आली आहे. नंदा मोहन बनसोडे ( वय – 34 ) वर्षे रा.- बनसोडेवस्ती वाफेगाव तालुका माळशिरस असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 19/09/2022 रोजी सायंकाळी 16/30 वा.चे पूर्वी वाफेगाव तालुका माळशिरस, जि. सोलापूर येथे फिर्यादी ची पत्नी हिचे व आरोपी चे अनैतिक संबंध होते. याच कारणातून आरोपी ने खून केल्याची माहिती समोर आली आहे.
दिनांक 19/09/2022 रोजी 22/11 वा. अकलूज पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे आणि अकलूज पोलीस ठाणे चे निरीक्षक अरुण सुगावकर यांचे मार्गदर्शन खाली सपोनि मारकड हे करीत आहेत.