December 1, 2023
yugarambh
Breaking News
राष्ट्रीय

‘द किंग ऑफ कॉमेडी’ राजू श्रीवास्तव यांचे निधन…

युगारंभ -कॉमेडियन राजू श्रीवास्तव  यांचं निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती.

10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं.त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.

1989 मध्ये रिलीज झालेल्या मौने प्यार किया या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात.

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचं अनेकांनी कौतुक देखील केलं. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही राजू श्रीवास्तव यांना म्हणलं जातं. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

Related posts

मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात “लेखन कौशल्य” या विषयावर कार्यशाळा संपन्न

yugarambh

Womens IPL : पुढच्या वर्षी येणार महिला आयपीएल? बीसीसीआय सचिवांचं मोठं वक्तव्य

Admin

गडकरी -ठाकरे ‘राज’कीय भेट?

yugarambh

मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यात ‘मोदी माफी मागो’ आंदोलन : नाना पटोले

Admin

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली…

yugarambh

किती महागले गहू, तांदूळ? गेल्या पाच वर्षातील दरवाढीची केंद्राने दिली माहिती

Admin

Leave a Comment