December 8, 2023
yugarambh
Breaking News
राजकीयराज्यराष्ट्रीय

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचे प्रकरण;घटनापीठाच्या केसेसचं लाईव्ह प्रक्षेपण होणार… लिंक पहा

अकलूज (युगारंभ )-सुप्रीम कोर्टाच्या कामकाजातलं ऐतिहासिक पाऊल.ज्या थेट प्रक्षेपणाची इतक्या दिवसांपासून चर्चा होती ते उद्यापासून प्रत्यक्षात पहायला मिळणार आहे.घटनापीठाच्या केसेसचं लाईव्ह प्रक्षेपण यू ट्यूबवर दाखवले जाईल.शुभारंभाच्याच दिवशी महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचे प्रकरणही पहा.

 

ही लिंक👇

Live:

http://webcast.gov.in/scindia/

  • नेमके प्रकरण काय आहे?

राज्यात झालेल्या सत्ता नाट्यामध्ये शिवसेना तसेच शिंदे गट दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांविरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव उपाध्यक्षांनी फेटाळला. त्यानंतर उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली.

   या सर्व पार्श्वभूमीवर या प्रकरणाची दाद मागण्यासाठी आमदार सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र, या प्रकरणात घटनात्मक पेच निर्माण झाला. त्यामुळे या प्रकरणात तातडीने सुनावणी न करता घटनापिठाच्या माध्यमातून सर्वांकष आणि दूरगामी परिणाम करणारा महत्त्वपूर्ण निर्णय येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता घटनापिठासमोर होणार आहे.

  • घटनापीठ का ?-

एखाद्या प्रकरणात राज्यघटनेतील तरतुदींचा न्यायशास्त्राप्रमाणे अर्थ लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना सर्वोच्च न्यायालयातील किमान पाच किंवा अधिक न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सदर घटनापीठ न्यायप्रविष्ट प्रकरणातील तरतुदी न्यायशास्त्राच्या कसोटीवर तपासून घेऊन त्यात न्यायनिवाडा करते.

  • घटनापीठ म्हणजे नेमके काय?

जेव्हा एखादी घटनात्मक बाब किंवा ज्या प्रकरणांमध्ये कायद्याचे मूलभूत स्पष्टीकरण करावे लागते, तेव्हा त्याची सुनावणी पाच किंवा त्या पेक्षा जास्त न्यायाधीशांद्वारे केली जाते. त्या न्यायपीठालाच घटनापीठ असे म्हणतात. यासह, भारतातील घटनापीठाची तरतूद संविधानाच्या कलम 145(3) मध्ये उपलब्ध आहे. यानुसार, एखाद्या खटल्याच्या सुनावणीमध्ये घटनेच्या व्याख्येशी संबंधित कायद्यातील महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल, तर असे प्रकरण न्यायपीठ सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचाच समावेश असलेल्या कमीत कमी 5 किंवा त्या पेक्षा जास्त न्यायाधीशांच्या घटनापीठसमोर पाठवले जाते. कायदेशीर बाबींशी संबंधित प्रश्न आणि कायद्याच्या अन्वयार्थाशी संबंधित अशा सर्व बाबींवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते, तेव्हा ही सुनावणी केवळ 5 न्यायाधीशांच्या कायमस्वरूपी घटनापीठाद्वारे केली जाते. जे एक घटनापीठ आहे.

घटनापीठाची स्थापना कशी होते?

एखादा खटला सोडवण्यासाठी जेव्हा दोन न्यायाधीश एकमेकांच्या विरोधात असतात आणि तो खटला निकाली निघत नाही, अशा परिस्थितीत, सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीश तिसऱ्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. उदाहरणार्थ – जेव्हा दोन न्यायमूर्तींचे मत भिन्न असते, तेव्हा प्रकरणाला न्याय देण्यासाठी घटनात्मक न्यायपीठ तयार केले जाते. ज्यामध्ये न्यायमूर्तींची संख्या 3, 5 किंवा 7 असते. न्यायाधीशांच्या या गटालाच घटनापीठ म्हणतात.

साहजिकच आता सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न व शंका या सुनावणीनिमित्त निर्माण झाले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे व सुप्रीम कोर्टाचे कामकाज आपल्याला यानिमित्त पाहायला मिळेल.

 

Related posts

अकलूज मधे युवासेनेच्या वतीने गद्दारांची अंत्ययात्रा .

yugarambh

सोलापूरमध्ये लग्नावरून परत येताना भीषण अपघात, डॉक्टर दाम्पत्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू

yugarambh

महर्षि प्राथमिक यशवंतनगरच्या शिक्षकांचा ‘राष्ट्रनिर्माण’ पुरस्काराने गौरव

yugarambh

एस. टी. महामंडळ दुरुस्त कधी होणार?

yugarambh

परीवर्तन याेजनेतून पारधी समाजाचा चेहरा माेहरा बदलणार – डाँ बस्वराज शिवपूजे

yugarambh

माळीनगर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

yugarambh

Leave a Comment