लवंग (युगारंभ )-अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये चालू शैक्षणिक वर्षातील पहिली शिक्षक-पालक सभा सदुभाऊ सांस्कृतिक भवन येथे उत्साहात संपन्न झाली.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संचालक उत्कर्ष शेटे,प्राचार्य राहुल सुर्वे,पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ.अभिजीत राजे-भोसले,गिरीजा उघडे,राजश्री टकले, वैशाली शेटे व मुख्याध्यापक कल्लाप्पा सुर्यवंशी उपस्थित होते.
विद्यालयातील यशवंत माने देशमुख यांनी सर्वांचे स्वागत केले तर सुनील कांबळे यांनी सभेचे प्रास्ताविक केले.या सभेसाठी बहुसंख्येने पालक उपस्थित होते. यावेळी अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना स्वरूपाराणी मोहिते-पाटील म्हणाल्या की जिजामाता कन्या प्रशाला ही एक उपक्रमशील शाळा आहे.याठिकाणी गुणवत्तेबरोबरच कला,क्रीडा गुणांचा विकास केला जातो यामुळे विद्यार्थिनी सर्वगुणसंपन्न बनतात.मुलींना शारीरिक व मानसिक सक्षम बनवण्याचे काम ही शाळा करत असते असे मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
सभेचे सूत्रसंचालन दिग्विजय जाधव यांनी केले तर अनुराधा निंबाळकर यांनी आभार मानले.