लवंग (युगारंभ )-श्री.जयसिंह मोहिते-पाटील प्राथमिक शाळा संग्रामनगर या आपल्या प्रशालेमध्ये आज दिनांक 30/09/2022 रोजी बाजार भरवणे या दैनंदिन उपक्रमांतर्गत आपल्या प्रशालेमध्ये विद्यार्थी, पालक,शिक्षक या सर्वांसाठी आठवडा बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आठवडा बाजारामध्ये अनेक फळभाज्या,पालेभाज्या तसेच दैनंदिन उपयोगातील अनेक वस्तू विक्रीसाठी आणलेल्या होत्या या छोट्या व्यवसायिकाकडून त्यांचे पालक त्यांनी आणलेल्या वस्तू खरेदी करत होत्या तसेच शिक्षक देखील त्या वस्तू खरेदी करत होते. वस्तू खरेदी विक्री होत असताना त्या छोट्या व्यवसायिकांच्या चेहऱ्यावरील आनंद हा वेगळा होता आनंदा बरोबरच त्यांना या उपक्रमामुळे व्यवहारिक ज्ञान तसेच वस्तूंच्या किंमती, व्यवहार कसा असतो ह्या गोष्टीची परिपूर्ण माहिती होत होती म्हणजे ह्या उपक्रमामुळे आनंद,मनोरंजन तसेच व्यावहारिक ज्ञान या गोष्टीचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत होते.
प्रशालेतील पालक, शिक्षक यांनी आपल्या विद्यार्थी किंवा आपल्या पाल्याकडून वस्तू खरेदी करण्याचा आनंद घेतला तसेच विद्यार्थ्यांनी देखील वस्तू विक्री करण्याचा आनंद घेतला. या आठवडा बाजाराला *प्रशाला समितीच्या अध्यक्षा निशा गिरमे मॅडम* व प्रशालेचे मुख्याध्यापक बी. टी शिंदे सर यांनी भेट देऊन विद्यार्थ्याकडून अनेक वस्तू खरेदी केल्या तसेच त्यांना व्यवहारांमधील अनेक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशाला समितीचे सदस्य महादेवराव अंधारे साहेब* व यशवंत साळुंखे साहेब* यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेतील शिक्षक खंडागळे सर,तांबोळी सर,पवार मॅडम,कदम मॅडम, यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.