December 2, 2023
yugarambh
Breaking News
Otherजिल्हापरिसरव्हिडिओ

भोंडला कार्यक्रमातून स्त्रीशक्तीच्या एकीचा जागर होतो -निशा गिरमे

यशवंतनगर (युगारंभ )-शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर भोंडला कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.प्रमुख पाहुण्या संचालिका निशा गिरमे,मुख्याध्यापक संजय गळीतकर, प्रशाला समिती सदस्य अनिल जाधव ,लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता वाघ यांच्या हस्ते हत्तीचे पुजन केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणातून भाग्यश्री गुजरे यांनी भोंडला सणाचे महत्व व भोंडला सणाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या परंपरा या विषयी माहिती सांगितली.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या निशा गिरमे यांनी आपल्या मनोगतातून भोंडला सणाच्या निमित्ताने सर्व महिला मुली एकत्र जमतात फेर धरतात आणि वेगवेगळ्या प्रकारची भोंडल्याची गाणी म्हणतात आणि यातूनच स्त्रीत्वाच्या एकीचा जागर होतो. म्हणूनच मनातल्या भावभावनांना वाट मोकळी करून देणारा हा कार्यक्रम असतो.निसर्गाप्रती आदर व्यक्त करणारा हा कार्यक्रम खिरापतीच्या असणाऱ्या स्वादाने फुलून येतो असे विचार याप्रसंगी व्यक्त केले.

 सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थिनींनी फेर धरून भोंडल्याची गाणी म्हटली .पारंपारिक खेळ घेण्यात आले .सगळीकडे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

प्रशालेतील श्रीजा पत्की, राजेश्वरी जाधव, शामबाला सावंत या विद्यार्थिनींनी “एलमा पैलमा गणेश देवा” हे गीत सादर केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रचना रणवरे,हसीरुण मुलाणी, नाझीया मुल्ला,स्नेहलता एकतपुरे प्रभावती लंगोटे व सर्व महिला शिक्षिकांनी उत्कृष्ट नियोजन केले.

सूत्रसंचालन प्रतिभा राजगुरू यांनी केले .तसेच आभार सुनिता निंबाळकर यांनी मानले.

Related posts

जगदिश पाणपोई- श्रीपूर येथे शुभारंभ

yugarambh

सापडलेले 20 हजार शिक्षकाला परत करून, महर्षि प्रशालेच्या” शिपाई कर्मचाऱ्याने दाखविला प्रामाणिकपणा

yugarambh

बहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजच्या वतीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांना समाजभूषण पुरस्कार

yugarambh

वाघोली ग्रामपंचायतीवर खंडोबा ग्रामविकास परिवर्तन गटाचे वर्चस्व

yugarambh

स.मा. वि. प्रशालेत महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री जयंती साजरी

yugarambh

प्रा. पापामिया खतीब यांच्या मुलीचा शाही विवाह समारंभ

yugarambh

Leave a Comment