माळीनगर (युगारंभ )- शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित ; महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला प्राथमिक विभाग यशवंतनगर येथे दिनांक 1/10/2022 वार ..शनिवार रोजी नवरात्र उत्सवानिमित्त “भोंडला ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमच्या अध्यक्ष्यस्थानी जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हा कार्याध्यक्षा .सौ.मीनाक्षी जगदाळे मॅडम या होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात काकासाहेब आणि अक्कासाहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली..यांचसोबत हत्तीची आणि प्रशालेत नवदुर्गा बनून आलेल्या मुलींचे पूजन करण्यात आले.”
हस्त नक्षत्रात खूप मोठा आणि चांगला पाऊस पडतो..सगळीकडे आनंदी वातावरण असते.याच सोबत आई जगदंबेची आराधना पण सुरु असते…विविध खेळ..गाणी असे महिलांचे कार्यक्रम अखंड भारतभर सुरु असतात..संस्कृती जतन करणे आणि वाढवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे..तसेच अभ्यासाबरोबर आरोग्यही सांभाळावे” असे सौ.जगदाळे वहिनी यांनी सर्व मुलांना आणि पालकांना सांगितले.
या प्रसंगी सर्व मुलींनी आणि महिला पालकांनी गरबा खेळण्याचा आनंद घेतला..सर्व मुलांना खिरापत वाटण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन .कु भाकरे मॅडम यांनी केले व आभार कु.शेख मॅडम यांनी मानलेसदर कार्यक्रम प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक शिवाजी पारसे सर यांच्या मार्गदर्शनानुसर…सर्व शिक्षकांनी यशस्वी केला..