लवंग (युगारंभ )-उद्योग महर्षि कै.उदयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या 62 व्या जयंतीचे औचित्य साधून श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्था,आनंदनगर यांच्यावतीने दि.2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा “प्रवाह भक्तीरसाचा” या किर्तन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते आज स्मृती भवन या ठिकाणी भक्तीमय वातावरणात संपन झाले व ह.भ.प.सतीश महाराज डोईफोडे सिंदखेडराजा यांच्या प्रथम पुष्पाने कार्यक्रमास सुरुवात झाली .
यावेळी उपस्थित मा.स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील, मा.आ.रणजीतसिंह मोहिते पाटील, मा.धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील, मा.कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील, मा.शिवतेजसिंह मोहिते पाटील, मा.किशोरसिंह माने पाटील, मा.सतीशराव माने पाटील, मा.क्रांतीसिंह माने पाटील, मा.शिवाजीराजे कांबळे तसेच प्रवाह पिक्चर चे संचालक श्री.सुनील खेडकर, निर्मिती व्यवस्थापक श्री प्रतीक जोशी व श्री.प्रमोद टकले, कीर्तनकार समन्वयक श्री.प्रमोद ननवरे, ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.