माळीनगर (युगारंभ )-शनिवार दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी जि.प.आदर्श प्राथमिक शाळा चाकोरे येथे भोंडल्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.जि.प.सदस्या सौ.मंगलताई वाघमोडे, गावच्या सरपंच सौ.दिपालीताई जाधव, ग्रामपंचायत सदस्य श्रीम. उषाताई गायकवाड, सौ. शोभाताई वाघमोडे, शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व महिला सदस्या, माता पालक संघाच्या सर्व सदस्या तसेच अनेक माता सदस्य उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व महिलांच्या हस्ते हत्तीचे पूजन करून झाली. मैदानात मध्यभागी सजवलेल्या हत्तीच्या प्रतिकृती भोवती सर्व महिलांनी फेर धरून भोंडल्याची गाणी गायली. शाळेतील मुलींनीही त्यांच्यासोबत फेर धरून दांडिया खेळला. त्यानंतर महिलांनाही दांडियाचा मोह आवरला नाही सर्वच महिलांनी कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. प्रमुख पाहुण्यांसह सर्वच महिलांनी पारंपारिक खेळ व गाणी गाऊन आनंद लुटला शाळेतील लहान मुलीं मुलींनीही फेर धरून गाणी गायली. महिलांच्या संगीत खुर्चीने कार्यक्रम आणखी मनोरंजक झाला. उपस्थित सर्व महिलांनी संगीत खुर्चीत सहभाग नोंदवला प्रथम तीन क्रमांकांना शाळेच्या वतीने बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
यानंतर भोंडल्यानिमित्त उखाण्यांची स्पर्धा घेण्यात आली. सर्व महिलांनी व शाळेतील शिक्षिकांनीही उखाणे स्पर्धेत सहभाग घेतला. शेवटी खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम घेण्यात आला खिरापत ओळखल्यानंतर त्या खिरापतीचे सर्व बालचमू व उपस्थित सर्व महिलांना वाटप करण्यात आले.
कार्यक्रमासाठी सुंदर अशा रांगोळीचे रेखाटन शाळेतील स्वयंसेवक शिक्षिका सौ.पल्लवी कुंभार व शाळेतील शिक्षिका श्रीम. गायकवाड मॅडम यांनीकेले होते. दांडियाची जबाबदारी श्रीम.सपकाळ मॅडम यांनी पार पाडली. कार्यक्रमासाठी फलकावरती सुंदर असे हत्तीचे चित्र शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कुमारी अक्षरा जंगम हिने काढले तर फलक लेखन श्री.पठाण सर व श्री.कदम सर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजगुरू सर व मुख्याध्यापक श्री. शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.शिंदे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले